Join us

Us Todani Yantra Yojana : राष्ट्रीय कृषी विकास योजने अंतर्गत ऊस तोडणी यंत्र खरेदीस मुदतवाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 11:05 IST

us todani yantra kharedi yojana राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत ऊस तोड यंत्र खरेदीसाठी सन-२०२२-२०२३ आणि सन २०२३-२०२४ या अर्थिक वर्षाकरिता सदर शासन निर्णयात नमूद अटी शर्ती आणि निकषांवर मान्यता देण्यात आली आहे. 

राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत ऊस तोड यंत्र खरेदीसाठी सन-२०२२-२०२३ आणि सन २०२३-२०२४ या अर्थिक वर्षाकरिता सदर शासन निर्णयात नमूद अटी शर्ती आणि निकषांवर मान्यता देण्यात आली आहे. 

सदरची योजना बँकेमार्फत राबविणे अपेक्षित असल्याने आणि विहित मुदतीत कार्यवाही पूर्ण होऊ शकली नाही या कारणास्तव शासन निर्णय दि.०९/०५/२०२४ अन्वये सदर योजनेस दि.२०/०३/२०२३ च्या शासन निर्णयातील अटी शर्ती आणि निकषांसह मुदतवाढ देण्यात आली आहे. 

आता शासन निर्णय दि.०६/०८/२०२४ अन्वये सदर योजनेस तांत्रिक कारणास्तव विहित मुदतीत कर्ज प्रकरणे मंजूर करणे तसेच विहित मुदतीत यंत्र खरेदीची कार्यवाही पूर्ण करणे शक्य झाले नसल्याने दि.१५/१०/२०२४ पर्यत पूर्वसंमती दिलेल्या अर्जदारांना ऊस तोडणी यंत्र खरेदी करण्याच्या कालावधीस विशेष बाब म्हणून १५ फेब्रुवारी, २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्याची विनंती केली होती. 

दि. २०/०३/२०२३ च्या शासन निर्णयातील अटी, शर्ती व निकषांवर दि.०९/०५/२०२४ च्या शासन निर्णयान्वये देण्यात आलेली मुदतवाढ आणि आता साखर आयुक्त, पुणे यांनी विषद केलेली तांत्रिक अडचण लक्षात घेता, पात्र लाभार्थी शासनाच्या योजनेपासून वंचित राहू नयेत या दृष्टिकोनातून केलेली विनंती विचारात घेण्यात येत आहे.

साखर आयुक्तालयाने शिफारस केल्यानुसार राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत ऊस तोडणी यंत्र अनुदान या प्रकल्पांअंतर्गत दि. २०/०३/२०२३ चा शासन निर्णय तसेच दि.०९/०५/२०२४ च्या शासन निर्णयान्वये दिलेल्या मुदतवाढीनुसार पुढील कार्यवाही होणार आहे.

साखर आयुक्तालयाने दि. १५/१०/२०२४ रोजीपर्यत पूर्वसंमती दिलेल्या अर्जदारांना ऊस तोड यंत्र खरेदी करण्याच्या कालावधीस विशेष बाब म्हणून १५ फेब्रुवारी, २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

टॅग्स :ऊससाखर कारखानेराज्य सरकारसरकारकाढणीबँककृषी योजनासरकारी योजना