Turmeric Breeding Seed : वसमत येथील बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या (Halad Research Center) स्थापनेनंतर पहिल्यांदाच राज्यात या केंद्राने हळदीचे पैदासकार बियाणे(Turmeric Breeding Seed) शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिले आहे.
विशेष म्हणजे, राज्य शासनाच्या बीज प्रमाणीकरण यंत्रणेकडे याची नोंद करण्यात आली आहे. संशोधन केंद्राचे अध्यक्ष हेमंत पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे शासन दरबारी दुर्लक्षित असलेल्या हळद पिकाला भौगोलिक मानांकन मिळून ओळख मिळाली आहे, अशी माहिती हळद संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांच्या ऑनलाइन बैठकीत दिली.(Halad Research Center)
बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्राची स्थापना, उभारणी, सामान्य शेतकऱ्यांच्या शेतातच बीजोत्पादन यावर्षी हळदीचे प्रमाणीकरण करण्याबाबत सर्व स्तरावर नियोजन करून बेणे वाटप केले आहे.
मात्र, आगामी काळात हळद पिकाचा बीजोत्पादन कार्यक्रम संशोधन केंद्र तसेच प्रगतिशील शेतकऱ्यांच्या शेतावर राबवून हळद उत्पादक शेतकऱ्यांना दर्जेदार प्रमाणित बियाणे पुरवठा करण्याचा मानस आहे. त्यामुळे दरवर्षीच्या तुलनेत हळदीचे लागवड क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढण्यास मदत होईल, असे यावेळी सांगण्यात आले. (Turmeric Breeding Seed)
करार, जागतिक परिषदेचे आयोजन, बाजारभावासाठी केलेले प्रयत्न, भौगोलिक मानांकनातून वसमत हळदीची जगभर होत असलेली ओळख, तसेच नवनवीन वाणांची उपलब्धता याविषयी शेतकऱ्यांना माहिती देण्यासाठी उच्चस्तरीय अधिकारी व शास्त्रज्ञांची ऑनलाइन बैठक २२ एप्रिल रोजी पार पडली.
संशोधन केंद्राचे अध्यक्ष हेमंत पाटील यांच्या संकल्पनेतून झालेल्या या बैठकीत संशोधन केंद्राचे व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र कदम, महाबीजचे जिल्हा व्यवस्थापक कुलकर्णी व शास्त्रज्ञांनी मार्गदर्शन केले.
मराठवाडा आणि विदर्भातील शेतजमिनीला अनुकूल अशा हळद रोपांची निर्मिती व नवीन वाण लागवडीचा प्रयोग करण्यासंदर्भात बैठकीमध्ये मार्गदर्शन करण्यात आले.(Halad Research Center)
आगामी काळात शेतकऱ्यांना हळदीचे शुद्ध व दर्जेदार बियाणे प्रमाणीकरण करून उपलब्ध व्हावे यासाठी संशोधन केंद्र प्रयत्न करत आहे, असे या बैठकीमध्ये शेतकऱ्यांना सांगण्यात आले.(Turmeric Breeding Seed)
यावेळी बीज प्रमाणीकरण यंत्रणेचे शास्त्रज्ञ मनोज माळी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र कदम, जिल्हा बीजप्रमाणीकरण अधिकारी कदम, जिल्हा व्यवस्थापक कुलकर्णी, तंत्र अधिकारी रमेश देशमुख यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.