Join us

Tur Procurement: तुरीच्या नाफेड नोंदणीसाठी आता 'ही' आहे डेडलाइन वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2025 12:25 IST

Tur Procurement : तुरीच्या हमीभावाने (Tur Procurement) खरेदीसाठी आवश्यक नोंदणीला आता १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे आता शेतकरी ९ एप्रिलपर्यंत नोंदणी करू शकतात. वाचा सविस्तर

Tur Procurement : राज्यात तुरीच्या हमीभावाने (Tur Procurement) खरेदीसाठी आवश्यक नोंदणीला आता १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. आता शेतकरी ९ एप्रिलपर्यंत नोंदणी करू शकतात.

राज्यात तूर खरेदीसाठी ५०७ केंद्रांना मंजुरी देण्यात आली आहेत. यात नाफेड (NAFED), व्हीसीएमएफ, डीएमओ यांच्या मार्फत खरेदी केली जात आहे. अमरावती जिल्ह्यातील २१ केंद्रांवर ९ एप्रिलपर्यंत नोंदणी होईल. (Tur Procurement) 

त्या तुलनेत खरेदी मात्र १४ केंद्रांवरच होत असल्याने अडचणीतील शेतकऱ्यांना मार्केटमध्ये तुरीची बेभाव विक्री करावी लागत असल्याचे वास्तव आहे. हंगामात शेतमालाचे भाव पडतात, त्यामुळे शासनाद्वारा शेतमाल खरेदी करून शेतकऱ्यांना हमीभावाचे संरक्षण दिल्या जाते. (Tur Procurement)

या प्रक्रियेत तुरीची ऑनलाइन नोंदणी २४ जानेवारीपासून करण्यात आली. त्यानंतर मुदत २४ फेब्रुवारीला संपल्याने ३० दिवसांची मुदतवाढ देण्यात आली व या अवधीतही शेतकऱ्यांची नोंदणी बाकी असल्याने मुदतवाढीची मागणी शासनाकडे करण्यात आली होती.  (Tur Procurement)

तूर खरेदीला अल्प प्रतिसाद

यंदा बाजारात तुरीला हमीभावापेक्षा दर कमी असूनही शासकीय खरेदी केंद्रावर तूर विक्रीसाठी शेतकऱ्यांचा अल्प प्रतिसाद पहायला मिळत आहे. (Tur Procurement)

राज्यभरात मंगळवार (२५ मार्च) रोजीपर्यंत ७५ हजार ८८५ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. यापैकी १० हजार ५६४ शेतकऱ्यांची १ लाख ५५ हजार ३४७ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली आहे. यात पणन विभागाच्या केंद्रावर सर्वाधिक ७८ हजार ५०८ क्विंटल, विदर्भ मार्केटिंग फेडरेशनच्या केंद्रांवर ३६, ८२७ क्विंटल, पृथाशक्तीने २४ हजार ५ क्विंटल, महाकिसान संघाने ९,५३० क्विंटल, महाकिसान वृद्धीने ६, ४५० क्विंटल तुरीची खरेदी केलेली आहे.

राज्यात तूर खरेदीसाठी ५०७ केंद्रांना मंजुरी देण्यात आली असून, त्यापैकी ४९३ केंद्र प्रत्यक्ष सुरू झालेले आहेत. 'नाफेड' सोबतच 'एनसीसीएफ' तर्फेही राज्यात १६० ठिकाणी केंद्र चालवले जात आहेत. या केंद्रावर १३,५०७ शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली असून आतापर्यंत ४,५८९ शेतकऱ्यांची ४९ हजार ६३४ क्विंटल तूर खरेदी झाली आहे.

अमरावतीमध्ये नऊ केंद्रांवर खरेदी नाही

'व्हीसीएमएफ'च्या अमरावती, चांदूरबाजार, अंजनगाव सुर्जी, येवदा, कापूसतळणी, भातकुली तसेच 'डीएमओ'च्या धारणी, खल्लार व नेरपिंगळाई केंद्रांवर आतापर्यंत तुरीची खरेदी करण्यात आली. मात्र, खरेदी सुरू नसल्याने शेतकरी अडचणीत आले आहे. या शेतकऱ्यांनी तूर विक्रीसाठी कुठे जावे, हा प्रश्न निर्माण झाला आहे.

डीएमओची केंद्र : अचलपूर (जयसिंग), अचलपूर, चांदूररेल्वे, दर्यापूर, धारणी, खल्लार, नेरपिंगळाई, नांदगाव खंडेश्वर व तिवसा.

व्हीसीएमएफ : धामणगाव, मोर्शी, वरुड, अमरावती, चांदूरबाजार अंजनगाव सुर्जी, येवदा, कापूसतळणी, भातकुली, गणेशपूर, शिंगणापूर व बाभळी.

हे ही वाचा सविस्तर : Soybean Hamibhav: सोयाबीनच्या ६ हजार रुपये हमीभावाचे काय झाले? वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रतुरातूरशेतकरीशेतीबाजारमार्केट यार्डमार्केट यार्ड