Pune : राज्यातील साखर कारखाने सुरू होऊन सव्वा महिना उलटला आहे. शेतकऱ्यांनी पहिल्या टप्प्यातील ऊस कारखान्यांना घातले आहेत. राज्यातील बहुतांश साखर कारखान्यांनी पहिली उचल गाळप सुरू होण्याच्या आधीच जाहीर केली होती. पण काही साखर कारखान्यांनी अजूनही पहिली उचल जाहीर केलेली नाही. अशातच अहिल्यानगर जिल्ह्यातील थोरात साखर कारखान्याने पहिली उचल जाहीर केली आहे.
दरम्यान, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याकडून सन २०२४- २५ या गळीत हंगामासाठी येणाऱ्या कार्यक्षेत्रातील उसाला प्रतिटन २०० रूपयांचे ऊस विकास अनुदान जाहीर केले आहे. त्याचबरोबर उसासाठी २ हजार ८०० रूपये पहिली उचल जाहीर करण्यात आली आहे. अनुदान आणि उचल दोन्ही मिळून शेतकऱ्यांना प्रतिटन ३ हजार रूपये शेतकऱ्यांना मिळणार आहेत.
कार्यक्षेत्राबाहेरील ऊसास २८०० रुपये प्रति टन भावकारखान्याच्या कार्यक्षेत्रातील कारखान्यांना ३ हजार रूपये प्रतिटन तर कारखान्याच्या कार्यक्षेत्राबाहेरील उसासाठी २ हजार ८०० रूपये प्रतिटन भाव मिळणार आहे. कारखान्याच्या संचालक मंडळाने हा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, राज्यातील बहुतांश साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना २ हजार ८०० ते ३ हजारांपेक्षा जास्त दर दिला आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली पट्ट्यातील शेतकऱ्यांना फायदा होत आहे.