padma shiri dada lad प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारकडून सन २०२६ सालच्या पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.
देशातील सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एक मानल्या जाणाऱ्या पद्म पुरस्कारांमध्ये कृषि क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल ज्येष्ठ प्रगतीशील शेतकरी व कार्यकर्ते माननीय श्री. श्रीरंग देवबा लाड (दादा लाड) यांना यंदाचा पद्म पुरस्कार जाहीर झाला आहे.
शेती क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, शाश्वत उत्पादन पद्धती आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी त्यांनी केलेले कार्य हे देशासाठी मार्गदर्शक ठरणारे आहे.
पद्मश्री दादा लाड यांचे कापूस पिकातील कार्य◼️ परभणी जिल्ह्यातील माळसोन्ना येथील प्रगतीशील शेतकरी आणि ज्येष्ठ कार्यकर्ते माननीय श्री. श्रीरंग देवबा लाड यांचा शेतकऱ्यांशी सातत्यपूर्ण व घनिष्ठ संपर्क तसेच राष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त झालेले “दादा लाड कापूस तंत्रज्ञान” हे त्यांचे अत्यंत महत्त्वपूर्ण योगदान मानले जाते.◼️ सन २००२–०३ पासून शेतकरी-आधारित संशोधनाच्या माध्यमातून त्यांनी कापूस पिकातील उत्पादकता कमी करणाऱ्या गळफांदी (मोनोपोडियल) फांद्यांचा सखोल अभ्यास केला आणि त्यांच्या प्रारंभिक छाटणीची प्रभावी व शास्त्रीय पद्धत विकसित केली.◼️ शेंडा खुडणी, अतीघन लागवड, ठिबक सिंचन व आच्छादन या तंत्रांचा एकत्रित अवलंब करून त्यांनी कापूस पिकासाठी एक समग्र, वैज्ञानिक आणि नफावर्धक तंत्रज्ञान विकसित केले.◼️ या पद्धतीमुळे उत्पादक फांद्यांकडे अन्नद्रव्यांचा पुरवठा वाढतो, बोंडांचे वजन अधिक होते, किडींचा प्रादुर्भाव कमी होतो, पीक कालावधी घटतो तसेच शेतकऱ्यांचा नफा लक्षणीयरीत्या वाढतो.◼️ यासोबतच, गेल्या चार दशकांहून अधिक काळ त्यांनी लाल कांधारी या देशी गायीच्या जातीच्या संवर्धन, संरक्षण व प्रसारासाठी अत्यंत उल्लेखनीय आणि व्यापक कार्य केले असून त्यांचे हे योगदान कृषि व पशुसंवर्धन क्षेत्रासाठी प्रेरणादायी ठरले आहे.
तसेच त्यांना नुकत्याच पार पडलेल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या २७ व्या दीक्षांत समारंभामध्ये माननीय श्री. दादा लाड यांना कृषी क्षेत्रातील अतुलनीय, नाविन्यपूर्ण व दीर्घकालीन योगदानाबद्दल “डॉक्टर ऑफ सायन्स” (मानद) पदवी प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
अधिक वाचा: आता दस्त नोंदणीला येणार वेग; राज्यात लवकरच नवीन ६० खासगी दस्तनोंदणी कार्यालये सुरू होणार
Web Summary : Farmer Srirang (Dada) Lad from Parbhani received the Padma Shri for his contributions to agriculture, including innovative cotton farming techniques and red Kandhari cattle conservation. He also received Doctor of Science by Vasantrao Naik Marathwada Agricultural University.
Web Summary : परभणी के किसान श्रीरंग (दादा) लाड को कृषि में योगदान के लिए पद्म श्री मिला, जिसमें अभिनव कपास खेती तकनीक और लाल कंधारी मवेशी संरक्षण शामिल हैं। वसंतराव नाइक मराठवाड़ा कृषि विश्वविद्यालय ने उन्हें डॉक्टर ऑफ साइंस की उपाधि भी दी।