Join us

यंदाच्या शासकीय गहू खरेदीने ओलांडला २५० लाख मेट्रिक टनांचा टप्पा; २१.०३ लाख शेतकऱ्यांना एमएसपीपोटी ६२१५५.९६ कोटी रुपये प्राप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2025 15:24 IST

गहू खरेदीचे अंदाजित उद्दिष्ट लक्षात घेतले तर केंद्रीय साठ्यात आतापर्यंत २०२५-२६ दरम्यान देशभरात गहू खरेदीने २५० लाख मेट्रिक टनांचा (LMT) महत्त्वपूर्ण टप्पा पार केला आहे.

देशातील प्रमुख गहू खरेदी राज्यांमध्ये रबी विपणन हंगामातील गहू खरेदी सुरळीतपणे सुरु आहे. दरम्यान निश्चित करण्यात आलेल्या ३१२ लाख मेट्रिक टन (एलएमटी) गहू खरेदीचे अंदाजित उद्दिष्ट लक्षात घेतले तर केंद्रीय साठ्यात आतापर्यंत २०२५-२६ दरम्यान देशभरात गहू खरेदीने २५० लाख मेट्रिक टनांचा (LMT) महत्त्वपूर्ण टप्पा पार केला आहे.

३० एप्रिलपर्यंत देशभरात २५६.३१ एलएमटी गहू खरेदी करण्यात आला असून ही आकडेवारी गेल्या वर्षीच्या तुलनेत २४.७८% अधिक आहे. मागील वर्षी याच कालावधीत २०५.४१ एलएमटी गहू खरेदी झाला होता.

पंजाब, हरियाणा, मध्यप्रदेश, राजस्थान आणि उत्तर प्रदेश या प्रमुख राज्यांनी यंदा मोठ्या प्रमाणावर गहू खरेदी केली आहे. पंजाबने सर्वाधिक १०३.८९ एलएमटी गहू खरेदी करून आघाडी घेतली असून, हरियाण्यात ६५.६७ एलएमटी, मध्यप्रदेशात ६७.५७ एलएमटी, राजस्थानात ११.४४ एलएमटी आणि उत्तर प्रदेशात ७.५५ एलएमटी गहू खरेदी करण्यात आला आहे.

या हंगामात देशभरातील २१.०३ लाख शेतकऱ्यांनी किमान आधारभूत किंमत (MSP) योजनेचा लाभ घेतला असून, त्यांना एकूण ₹६२,१५५.९६ कोटी रुपयांचे थेट आर्थिक लाभ मिळाले आहेत. बहुतांश शेतकऱ्यांना २४ ते ४८ तासांत MSPची रक्कम मिळाल्याचेही सांगण्यात आले.

गहू खरेदीतील या यशाचे श्रेय केंद्रीय अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने हाती घेतलेल्या एकत्रित उपाययोजनांना जाते. राज्यनिहाय कृती योजना, खरेदी केंद्रांची आधीपासून तयारी, शेतकऱ्यांची नोंदणी आणि एफएक्यू (FAQ) निकषांबाबत दिलेल्या सवलती यामुळे गहू खरेदी प्रक्रिया अधिक सुलभ झाली आहे. केंद्र सरकारच्या धोरणात्मक उपायांमुळे आणि वेळेवर केलेल्या नियोजनामुळे देश यंदा गहू साठवणुकीत नवा उच्चांक गाठण्याच्या मार्गावर आहे. 

हेही वाचा : रेबिज बाधित जनावरांचे दूध सेवन केल्यास रेबिज होतो का? वाचा काय सांगताहेत तज्ञ

टॅग्स :गहूशेती क्षेत्रसरकारबाजारपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमार्केट यार्डशेतकरी