Join us

दर्जेदार बियाणे निर्मितीसाठी संशोधना सोबतच निधीची ही आवश्यकता

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2023 10:51 AM

छत्रपती संभाजीनगर येथील हॉटेल ताज मध्ये बाराव्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी आणि इंडियन सोसायटी टेक्नॉलॉजी, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच नॅशनल सीड रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटर, वाराणसी यांच्या सहकार्याने कृषी व शेतकरी कल्याण विभाग, भारत सरकार यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आली आहे.

छत्रपती संभाजीनगर येथील हॉटेल ताज मध्ये बाराव्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी आणि इंडियन सोसायटी टेक्नॉलॉजी, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच नॅशनल सीड रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटर, वाराणसी यांच्या सहकार्याने कृषी व शेतकरी कल्याण विभाग, भारत सरकार यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आली आहे.

प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. मंगला राय म्हणाले की, बदलत्या हवामानानुसार बियाणे संशोधनाची दिशाही बदलावी लागेल आणि यासाठी निधीची देखील गरज भासणार आहे. आपल्या देशात जगाच्या १८% लोकसंख्या आहे त्यामुळे या सर्व नागरिकांच्या समतोल आहार सोबतच जीवनमान उंचावणे याचे नक्कीच मोठे आव्हान आपल्यासमोर उभे आहे. यासाठी देशातील सर्व संशोधन संस्थांनी समन्वयाने काम करत काळानुरूप संशोधन करण्याची गरज आहे. यामुळे नक्कीच आपल्या संशोधनाचा गौरव वाढण्यास मदत होईल. या परिषदेचे प्रास्ताविक स्वागत अध्यक्ष तथा वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्र मणि यांनी केले. आपला मराठवाडा विभाग हा बदलत्या हवामानाच्या कचाट्यात सापडत आहे, कधी कमी पाऊस तर कधी जास्त पाऊस यामुळे हातात आलेली पिके शेतकऱ्याच्या पदरात पडत नाही. त्यामुळे नेमकी यासाठी कशा प्रकारचा संशोधनाची दिशा लागेल याची दिशा ठरणारी ही बैठक राहील असं मला विश्वास आहे.

पुढील दोन दिवस शेतकरी बांधवांना उपयोग होणारी सर्व चर्चा होईल अशी मला संशोधकाकडून अपेक्षा आहे. या परिषदेतून भविष्यातील शेती संशोधन कशा प्रकारचे असावे यासाठी नक्कीच दिशा देणारे राहील याची मला खात्री आहे. याप्रसंगी अनेक मान्यवरांनी भाषने केली, त्यामध्ये प्रामुख्याने देशातील एकंदरीत बदलते हवामान आणि त्यामुळे पिकाचे होणारे नुकसान यासाठी विभागवार विद्यापीठाने पुढाकार घेत योग्य ते संशोधन निर्मिती करण्याची गरज आहे. यामध्ये साधारणता: पिकाच्या कालावधीचा विचार करून आपापल्या हवामानाचा विचार करत योग्य ते संशोधन शेतकऱ्याला कसे सोयीचे होईल याचा विचार करणे गरजेचे आहे अशा एकंदरीत सर्वच मान्यवरांनी अपेक्षा व्यक्त केल्या.

या कार्यक्रमांमध्ये विशेषतः पद्मश्री राहीबाई पोपेरे यांनी अतिशय आवेशपूर्ण असे भाषण केले. त्या म्हणाल्या की, मी कुठली शाळा शिकलेली नाही पण आज माझा शेतीविषयाचा अनुभव बघता कृषी पदवीधर देखील माझ्यासोबत चर्चा करण्यासाठी येतात आणि कार्यक्रम संपल्यानंतर माझे फोटो काढत आहेत. त्यांना माझी एकच विनंती की, माझ्यासोबत फोटो काढण्याऐवजी तुम्ही माझ्या विचाराची कास धरत शेती करावी असे शेवटी म्हणाल्या.

या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे संचालक संशोधन डॉ. दत्तप्रसाद वासकर यांनी केले तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. डी. जी. मोरे यांनी केले. या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर केंद्रीय कृषी आयुक्त भारत सरकार डॉ. पी.के. सिंग, माजी अध्यक्ष कृषी शास्त्रज्ञ निवड मंडळ डॉ. सी. डी. मायी, डॉ. एच. एस. गुप्ता, आयएसएसटी, डॉ. एस. ए. पाटील माजी संचालक भारतीय कृषी संशोधन संस्था, नवी दिल्ली डॉ. बीजेन्द्र सिंग, आचार्य नरेंद्र देवा कृषी विद्यापीठ, आयोध्या, अजय राणा, एफएसआयआय, नवी दिल्ली, राजू बारवाले, चेअरमन महिको ग्रुप, मुंबई बीज माता पद्मश्री राहीबाई पोपेरे, प्रयोगशील शेतकरी हरियाणा पद्मश्री कंवल सिंग चव्हाण डॉ. डी. के. श्रीवास्तव, सह आयुक्त गुणवत्ता नियंत्रण, भारत सरकार, नवी दिल्ली, डॉ. डी. पी. वासकर,  संचालक संशोधन तथा संयोजक इत्यादी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. या परिषदेसाठी देशभरातील शास्त्रज्ञासह आंतरराष्ट्रीय पातळीवरील संशोधकांची मोठी उपस्थिती लाभली.

टॅग्स :शेतकरीपाऊसवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठहवामानशेती क्षेत्र