कोल्हापूर : शेतीमध्ये 'एआय'चा वापर करून उत्पादकता वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू असून, त्याला प्रोत्साहन देण्यासाठी या तंत्रज्ञानाच्या वापराने ऊस उत्पादन वाढीसाठी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने कर्जवाढीचे धोरण मंजूर केले आहे.
शेतकऱ्याला मूळ पीक कर्ज मर्यादेपेक्षा हेक्टरी साडेदहा हजार रुपये जादा देण्याचा निर्णय बँकेने घेतला आहे. राज्यस्तरीय तांत्रिक समितीच्या शिफारशीनुसार, बँकेच्या कार्यकारी समितीच्या बैठकीमध्ये हा महत्त्वाचा निर्णय झाला.
बँकेचे अध्यक्ष मंत्री हसन मुश्रीफ यांनी कृषी क्षेत्रामध्ये ए. आय. तंत्रज्ञानाच्या वापरासाठी बँकेने दोन कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
४० टक्के उत्पादन वाढ..!◼️ कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात ए. आय. च्या कृषी क्षेत्रातील वापरामुळे ऊस पीक उत्पादन वाढते, असा तज्ज्ञांचा अहवाल आहे.◼️ या उत्पादन वाढीसाठी सॅटेलाइट सपोर्ट, मॉइश्चर सेंसर, वेदर स्टेशनचा वापर केल्यास ऊस उत्पादनामध्ये वाढ तर होते.◼️ तसेच वीजवापर, पाणी, खते, कीटकनाशके इत्यादी खर्चामध्ये ३० टक्केपर्यंत बचत होत असल्याचे प्रयोगाअंती सिद्ध झाले आहे.
असे मिळते जिल्हा बँकेतून कर्ज (हेक्टर)आडसाली ऊस लागवडीसाठी - १.७५ लाखपूर्व हंगामी लागवडीसाठी - १.५० लाखसुरू लागवडीसाठी - १.५० लाखखोडवा पिकासाठी - १.२५ लाख
अधिक वाचा: शेतकरी उत्पादक गट, कंपन्या व सहकारी संस्थासाठी ऊस विकास योजना; कसा घ्याल लाभ? वाचा सविस्तर