Join us
Daily Top 2Weekly Top 5

कडधान्य खाण्याची सुद्धा असते योग्य पद्धत! जाणून घ्या याच गुणकारी पद्धतीविषयी अधिक माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 16:59 IST

कच्चे स्प्राउट्स खाणे खूप आरोग्यदायी मानले जाते, पण त्याचे सेवन करण्याची योग्य पद्धत जाणून घेणे महत्वाचे आहे. आयुर्वेदानुसार ते शरीरालाही हानी पोहोचवू शकते. त्यामुळे होणाऱ्या समस्या जाणून घ्या, ते कसे खावे आणि कोणत्या लोकांनी खाऊ नये हे जाणून घ्या.

कच्चे स्प्राउट्स खाणे खूप आरोग्यदायी मानले जाते, पण त्याचे सेवन करण्याची योग्य पद्धत जाणून घेणे महत्वाचे आहे. आयुर्वेदानुसार ते शरीरालाही हानी पोहोचवू शकते. त्यामुळे होणाऱ्या समस्या जाणून घ्या, ते कसे खावे आणि कोणत्या लोकांनी खाऊ नये हे जाणून घ्या.

वाताचे प्रमाण वाढते : स्प्राउट्स, ज्याला  पोषक तत्वांचे पॉवर हाऊस मानले जाते, ते शरीरात वात वाढवू शकतात. तज्ञांच्या मते, या स्थितीत लोकांना पाय किंवा सांधे दुखण्याची तक्रार वाढू शकते.

पचन क्रिया : जास्त वेळ पाण्यात भिजवून ठेवल्याने अंकुरित आहार जड होतो. तुम्ही याचे सेवन केल्यास तुमची पचनसंस्था नीट काम करू शकत नाही आणि त्यामुळे तुम्हाला नेहमी जडपणा जाणवू शकतो.

अशा प्रकारे खा : मोड आलेली कडधान्य कच्चे खाल्ल्याने काही लोक आजारी पडू शकतात. अशा वेळी ते शिजवून खाणे उत्तम मानले जाते. यासाठी एका कढईत थोडे तेल घ्या आणि कडधान्य चवी पुरत्या मिठात शिजवा. खाताना तुम्ही आवडीनुसार चाट मसाला ही टाकू शकाता. असे केल्याने ते चविष्ट देखील होतील.

या लोकांनी ते खाऊ नये :आरोग्य तज्ञ आणि आहारतज्ञांचे असे मत आहे की गर्भवती महिला, मुले आणि ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत आहे त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच हा आहार घ्यावा हे म्हत्वाचे आहे.

हेही वाचा : पोषणमूल्यांनी समृद्ध बोर देईल वर्षभर उत्पन्न; बोर फळ प्रक्रिया उद्योगात मोठ्या संधी

English
हिंदी सारांश
Web Title : Eat sprouts right! Know the beneficial method and who should avoid.

Web Summary : Sprouts are nutritious but can increase 'Vata' and cause digestion issues if not consumed properly. Cook them lightly with spices. Pregnant women, children, and those with weak immunity should consult a doctor before consuming.
टॅग्स :अन्नशेती क्षेत्रभाज्याआरोग्य