Join us
Daily Top 2Weekly Top 5

कृषी सेवा मुख्य परीक्षेचा निकाल अखेर सहा महिन्यांनी जाहीर; पुढील प्रक्रिया कशी असणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 10:37 IST

mpsc krushi seva mulakhat महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) कृषी सेवा मुख्य परीक्षा २०२४ चा निकाल जाहीर केला आहे. यात एकूण ८२७ उमेदवार मुलाखतीस पात्र ठरले आहेत.

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) कृषी सेवा मुख्य परीक्षा २०२४ चा निकाल जाहीर केला आहे. यात एकूण ८२७ उमेदवार मुलाखतीस पात्र ठरले आहेत.

त्यातील ५२० उमेदवार पुण्यातील आहेत. प्रशासकीय कारणास्तव तीन उमेदवारांचा निकाल राखून ठेवण्यात आला आहे.

लेखी परीक्षेच्या निकालाआधारे मुलाखतीस पात्र ठरलेल्या उमेदवारांचा सविस्तर मुलाखत कार्यक्रम www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचेही आयोगाने स्पष्ट केले आहे.

एमपीएससीने दिलेल्या माहितीनुसार, २६ सप्टेंबर २०२४ रोजी कृषी सेवा संवर्गातील २५८ पदांचा समावेश करण्यात आला.

त्यामुळे एकूण ८२८ पदांसाठी १ डिसेंबर २०२४ रोजी संयुक्त पूर्व परीक्षा घेण्यात आली. एमपीएससीने १८ मे रोजी कृषी सेवा मुख्य परीक्षा २०२५ घेतली होती.

...तर रद्द होईल उमेदवारीमुलाखतीसाठी प्रथमदर्शनी पात्र ठरलेल्या सर्व उमेदवारांना मुलाखतीस बोलावण्यात येत आहे. मात्र, उमेदवारांनी अर्जात दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळून आल्यास अथवा अर्जातील दाव्यानुसार आवश्यक मूळ प्रमाणपत्रांची पूर्तता मुलाखतीचे वेळी न केल्यास, अधिसूचनेतील तरतुदीनुसार दावे तपासताना व अन्य कारणांमुळे अपात्र ठरणाऱ्या संबंधित उमेदवारांची उमेदवारी कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येणार आहे.

विभागनिहाय पात्र उमेदवारअमरावती - ४६छत्रपती संभाजीनगर - १०३नागपूर - ४३नाशिक - ९७नवी मुंबई - १८पुणे - ५२०

अशी असणार प्रक्रिया◼️ मुख्य परीक्षांच्या निकालानंतर मुलाखती पूर्ण होऊन तात्पुरत्या निवड याद्या प्रसिद्ध झाल्या.◼️ कृषी सेवेचे मात्र निकालच रखडले होते.◼️ अखेर एमपीएससीने मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे.◼️ दरम्यान, पात्र न ठरलेल्या ज्या उमेदवारांना उत्तरपत्रिकेतील गुणांची फेरपडताळणी करायची आहे त्यांनी गुणपत्रक प्रोफाइलमध्ये मिळाल्यापासून १० दिवसांच्या आत आयोगाकडे ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे.

अधिक वाचा: जिवंत सातबारा मोहीमेचा दुसरा टप्पा सुरु; आता सातबाऱ्यावर करता येतील 'ह्या' दुरुस्त्या

English
हिंदी सारांश
Web Title : MPSC Announces Agriculture Services Main Exam Results After Six Months Delay

Web Summary : MPSC declared the Agriculture Services Main Exam 2024 results, qualifying 827 candidates for interviews. Pune has 520 successful candidates. Interview schedules will be published on www.mpsc.gov.in. Document verification is crucial; discrepancies lead to disqualification. Re-evaluation requests are accepted within 10 days of receiving mark sheets.
टॅग्स :एमपीएससी परीक्षापरीक्षाशेती क्षेत्रराज्य सरकारविद्यार्थीसरकारपुणेमुलाखत