Join us

'या' जिल्ह्यातील कृषी क्षेत्राच्या विकासासाठी जिल्हा प्रशासन गूळ उत्पादन आणि मत्स्यपालनाला देणार चालना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 14:38 IST

कृषी क्षेत्राच्या सर्वागीण विकासासाठी 'या' जिल्ह्यातील उसाचे क्षेत्र लक्षात घेता आता जिल्हा प्रशासनाकडून गूळ उत्पादन आणि मत्स्यपालन याला प्राधान्य दिले जाणार आहे. दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन, पीक विविधता आणि स्थानिक उत्पादन आधारित उपजीविका निर्मिती यासंबंधी महत्त्वाचे निर्णय एका बैठकीत घेण्यात आले.

नंदुरबार जिल्ह्यातील कृषी क्षेत्राच्या सर्वागीण विकासासाठी जिल्ह्यात उसाचे क्षेत्र लक्षात घेता गूळ उत्पादन आणि मत्स्यपालन याला प्राधान्य दिले जाणार आहे. दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन, पीक विविधता आणि स्थानिक उत्पादन आधारित उपजीविका निर्मिती यासंबंधी महत्त्वाचे निर्णय एका बैठकीत घेण्यात आले.

जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली कृषी क्लस्टर बैठक घेण्यात आली. यावेळी कृषी संदर्भातील विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. कृषी अधिकारी आणि कृषी क्षेत्रातील अभ्यासक यावेळी उपस्थित होते. यावेळी इतरही कृषी विषयक विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्यात आले.

ऊस उत्पादन चांगले...

जिल्ह्यात तीन साखर कारखाने आहेत. जिल्ह्याच्या हद्दीलगत गुजरात राज्यात दोन आणि मध्यप्रदेशात एक अशा तीन खांडसरी देखील आहेत. कारखाने आणि खांडसरींना जिल्ह्यातून ऊस पुरविला जात असतो. त्यामुळे मुबलक प्रमाणात ऊस जिल्ह्यात उपलब्ध असल्याचे आकडेवारीवरून सिद्ध होते. परिणामी गुऱ्हाळे चालू शकतात.

गूळ उत्पादनाला जिल्ह्यात चांगला वाव...

पीक विविधता व स्थानिक गूळ उत्पादनाला प्रोत्साहन देण्यात येणार आहे. यात नवीन व बाजारपेठेला मागणी असणाऱ्या पिकांच्या प्रोत्साहनाबरोबर स्थानिक गूळ उत्पादनात शेतकऱ्यांचा सहभाग वाढवण्यावर भर देण्यात आला. जिल्ह्यात उसाचे असलेले मुबलक उत्पादन लक्षात घेता या उद्योगाला वाव आहे.

• याशिवाय शेतकरी, उत्पादक गट व कृषी तज्ज्ञांसाठी ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस जिल्हा कृषी संमेलनाचे आयोजन होणार आहे. कृषी विकासाला शाश्वततेची नवी दिशा देण्यासाठी शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीबरोबर स्वावलंबन व सामूहिक विकासासाठी प्रभावी रणनीती आखण्यात यावी, यावरही चर्चा करण्यात आली.

मत्स्य पालनाची जोड...

• बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यात पेसा क्षेत्रातील जिल्हा परिषद अखत्यारीतील तलावांचे पुनरुज्जीवन करून बचत गटांना मत्स्यपालनासाठी देण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे ग्रामीण भागात शाश्वत उपजीविकेचे साधन निर्माण होणार आहे. मत्स्य व्यवसायास चालना देण्यासाठी देहली येथे नवीन मत्स्यबीज केंद्र स्थापन करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला.

• बचत गट व शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून कुक्कुटपालन प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे. राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ येत्या काळात जिल्ह्यात येऊन दुग्ध व्यवसायाच्या संधींचा अभ्यास करणार आहे.

हेही वाचा : फणसाच्या प्रक्रिया उद्योगातून मिळवा उत्पन्नाची संधी; जॅमपासून चिप्सपर्यंत जाणून घ्या सविस्तर कृती

टॅग्स :शेती क्षेत्रविदर्भऊसपीकशेतीशेतकरी