Join us

शेतकऱ्यांनी स्थापना केलेल्या बचत गटाची किमया भारी; ऊस तोडणी यंत्रासह बारा ट्रॅक्टरची केली खरेदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2024 17:16 IST

हदगाव तालुक्यातील पेवा येथील दत्त आत्मा शेतकरी पुरुष गटाने (Datta Aatma Farmers Group) समुहाच्या माध्यमातून शेतकरी उपयोगी ऊस तोडणी (हार्वेस्टर) मशीन (Sugarcane Harvester) आणि बारा ट्रॅक्टर ट्रॉलीसह खरेदी करून परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलास दिला आहे.

रामेश्वर बोरकर 

अनेक महिला बचत गटानी लघु उद्योग उभारून आर्थिक प्रगती साधल्याची उदाहरणे आपण ऐकली आहेत. परंतु, शेतकरी पुरुष गटाची स्थापना तुरळक आणि त्या गटाने समुहाच्या माध्यमातून आर्थिक प्रगती साधल्याचे ग्रामीण भागात क्वचितच ऐकण्यात आहे.

परंतु, नांदेड जिल्ह्याच्या हदगाव तालुक्यातील पेवा येथील दत्त आत्मा शेतकरी पुरुष गटाने समुहाच्या माध्यमातून शेतकरी उपयोगी ऊस तोडणी (हार्वेस्टर) मशीन आणि बारा ट्रॅक्टर ट्रॉलीसह खरेदी करून परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलास दिला आहे.

या भागात ऊस पिकाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर असून, ऊस तोडणीकरिता ऊसतोड टोळीसाठी शेतकऱ्यांना वणवण भटकत राहावे लागत होते. वेळेवर ऊसतोड होत नसल्याने उसाच्या उत्पादनात घट होऊन शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत होते. ही गोष्ट मनाशी हेरून या बचत गटाने ऊसतोड मशीन (हार्वेस्टर) आणि बारा ट्रॅक्टर ट्रालीसह खरेदी केले. आता परिसरातील ऊस तोडणीकरिता शेतकऱ्यांना वणवण भटकण्याची गरज राहिली नाही.

ऊस तोडणी (हॉवेस्टर) ची किंमत एक कोटी ४० लक्ष रुपये आहे. श्री दत्त शेतकरी पुरुष गटाने पन्नास हजार रुपये भरून हे मशीन घेतले. त्यानंतर, बचत गटातील सदस्यांनी वैयक्तिक ट्रॅक्टर खरेदी केले. त्यासाठी प्रत्येक सदस्याने दर महिन्याला एक हजार रुपये बचत केली. बचत केलेली रक्कम पुढे अत्यल्प दराने वाटप करून एक चांगली रक्कम जमा करण्यात आली.

ज्यातून खरेदी केलेले हे मशीन दिवसभरात अडीचशे टन ऊसाची तोडणी करते. आता या मशीनचे ऊस तोडणीसाठी लातूर येथील ऊस कारखाना आणि हदगाव तालुक्यातील शिऊर येथील साखर कारखाण्याशी करार करण्यात आले, अशी माहिती गटाचे अध्यक्ष अजय जाधव यांनी दिली.

२० शेतकऱ्यांनी केला पुरुष गट स्थापन

■ पेवा येथे सतीश खानसोळे यांच्या मार्गदर्शनाखाली २० शेतकऱ्यांनी एकत्र येऊन २०१५ साली दत्त आत्मा शेतकरी पुरुष गट स्थापन केला. या गटाचा अध्यक्ष म्हणून सुरज जाधव यांना जबाबदारी देण्यात आली.

■ सर्व शेतकऱ्यांनी थोडी थोडी नऊ वर्ष आर्थिक बचत केली. मुळात शेतकरी एकत्र येऊन गटाची स्थापना केल्याने गटाच्या माध्यमातून शेतकऱ्यांकरिता काही तरी करायचे, असा उद्देश मनाशी बाळगून वाटचाल करीत होते.

हेही वाचा : Bajari Health Benefits : हिवाळ्यात बाजरी खाण्याचे विविध आरोग्यदायी फायदे

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेतीऊसमराठवाडानांदेडनांदेड