lokmat Supervote 2024
Lokmat Agro >शेतशिवार > नवी मुंबईत १५ ते १७ सप्टेंबर दरम्यान होणार चौदावी जागतिक मसाले परिषद

नवी मुंबईत १५ ते १७ सप्टेंबर दरम्यान होणार चौदावी जागतिक मसाले परिषद

The 14th World Spice Conference will be held in Navi Mumbai from September 15 to 17 | नवी मुंबईत १५ ते १७ सप्टेंबर दरम्यान होणार चौदावी जागतिक मसाले परिषद

नवी मुंबईत १५ ते १७ सप्टेंबर दरम्यान होणार चौदावी जागतिक मसाले परिषद

मसाल्यांच्या बाजारपेठेमध्ये भारत आघाडीचा देश असून या क्षेत्रामधील अतुलनीय विविधता असलेला देश आहे. उत्पादन क्षेत्रातील शेतकरीच नव्हे तर मसाला क्षेत्र देखील देशाच्या परकीय चलनात महत्त्वाचे योगदान देत आहे.

मसाल्यांच्या बाजारपेठेमध्ये भारत आघाडीचा देश असून या क्षेत्रामधील अतुलनीय विविधता असलेला देश आहे. उत्पादन क्षेत्रातील शेतकरीच नव्हे तर मसाला क्षेत्र देखील देशाच्या परकीय चलनात महत्त्वाचे योगदान देत आहे.

शेअर :

Join us
Join usNext

१४ व्या जागतिक मसाले परिषदेचे नवी मुंबईत आयोजन होणार असून याबाबत केंद्र सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या मसाले बोर्डाचे सचिव डी. साथियन यांनी मुंबईत वार्ताहर परिषदेत माहिती दिली. विविध व्यापार आणि निर्यात मंचांच्या सहकार्याने आयोजित केलेली ही जागतिक मसाले परिषद, मसाले क्षेत्रासाठीच्या सर्वात मोठ्या  व्यावसायिक व्यासपीठांपैकी एक आहे. या परिषदेत धोरणकर्ते, नियामक अधिकारी, मसाले व्यापार संघटना, सरकारी अधिकारी तसेच जी २० देशांमधील तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ  सहभागी होणार आहेत.

या परिषदेविषयी प्रसारमाध्यमांना माहिती देताना डी. साथियन म्हणाले, “नवी मुंबईत १५ ते १७ सप्टेंबर २०२३ दरम्यान होत असलेल्या मसाला उद्योग क्षेत्रातील सर्वात मोठ्या जागतिक कार्यक्रमांपैकी एक असलेल्या या कार्यक्रमात जागतिक मसाले उद्योगातील सर्व हितधारक एक छत्राखाली येतील. मसाल्यांच्या बाजारपेठेमध्ये भारत आघाडीचा देश असून या क्षेत्रामधील अतुलनीय विविधता असलेला देश आहे. उत्पादन क्षेत्रातील शेतकरीच नव्हे तर मसाला क्षेत्र देखील देशाच्या परकीय चलनात महत्त्वाचे योगदान देत आहे. जागतिक मसाले परिषद २०२३ ही मसाल्याचे ग्राहक आणि विक्रेते यांच्यासाठी या क्षेत्रातील समस्यांवर चर्चा करण्याचे, ज्ञानाची देवाणघेवाण करण्याचे आणि मसाल्याच्या व्यापारात सर्वोत्तम पद्धती विकसित करण्याचे व्यासपीठ म्हणून काम करेल.”

या परिषदेतील सहभागाविषयी माहिती देताना भारतीय मसाले बोर्डाचे संचालक बी. एन. झा म्हणाले, “या परिषदेत ८०० ते १००० प्रतिनिधी सहभागी होण्याची शक्यता आहे. सुमारे ८० देशांनी यापूर्वीच नोंदणी केली आहे आणि आगामी काळात आणखी जास्त आंतरराष्ट्रीय नोंदण्या अपेक्षित आहेत. त्यामुळे या परिषदेत जगभरातील देशांचा सहभाग आहे.”

जागतिक मसाले परिषद २०२३ ही कोविड -१९ पश्चात मसाले उद्योगातील सध्याचा कल, उदयोन्मुख आव्हाने आणि यातून मार्ग काढण्याबाबत चर्चा करण्यासाठी हितधारकांसाठी एक उत्तम व्यासपीठ आहे. या कार्यक्रमात  मसाल्यांच्या व्यापाराला प्रोत्साहन देण्यासाठी विशेष व्यावसायिक सत्रे तसेच दुसऱ्या दिवशी आयातदारांसोबत रिव्हर्स बायर सेलर मीट (RBSM) आयोजित करण्यात आली आहे. भारताच्या प्रतिष्ठित G20अध्यक्षतेच्या पार्श्‍वभूमीवर मुंबईत १५-१७ सप्टेंबर २०२३ दरम्यान १४व्या  जागतिक मसाले परिषदेचे आयोजन करण्यात आले असून, याद्वारे जागतिक मसाला व्यापारातील नवनवीन संधी खुल्या होतील.

१९९० मध्ये स्थापन झालेली जागतिक मसाला परिषद या क्षेत्रातील जागतिक दृष्टीकोन एकत्र आणण्याबरोबरच मसाल्यांच्या व्यापारात भारताचे नेतृत्व टिकवून ठेवण्यात यशस्वीपणे योगदान देऊ शकते.

जागतिक मसाले परिषद २०२३ ची ठळक वैशिष्ट्ये

जागतिक मसाले परिषद २०२३ ची संकल्पना, "व्हीजन-२०३० : S-P-I-C-E-S (सस्टेनेबिलिटी, प्रॉडक्टिव्हिटी, इनोवेशन, कोलॅबरेशन, एक्सेलन्स ॲन्ड सेफ्टी)" म्हणजेच  शाश्वतता, उत्पादकता, नवोन्मेष, सहकार्य, उत्कृष्टता आणि सुरक्षितता अशी आहे.

जागतिक मसाले परिषद २०२३ च्या सत्रांमध्ये पिके आणि बाजार अंदाज व  कल; अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता मानके आणि प्रमाणपत्रे; औषधी, पोषण संबंधी, अभिनव  आणि प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा उत्पादनांमध्ये मसाल्यांना वाव आणि संधी; चव वाढवणारे मसाले आणि अन्नपदार्थ; रेडी टू यूझ/कुक/ड्रिंक उत्पादने; स्पाईस ऑइल आणि ओलिओरेसिनसाठी कल आणि संधी, ग्राहकांचे प्राधान्य आणि उदयोन्मुख कल; पुरवठा साखळी व्यवस्थापनातील विश्वासार्हता आणि अखंडता, पॅकेजिंगसंबंधी आंतरराष्ट्रीय आवश्यकता, जागतिक मसाला बाजारपेठेतील कल आणि संधी यावर चर्चा होईल.

जागतिक मसाले परिषद २०२३ चा भाग म्हणून मसाले आणि मूल्यवर्धित मसाले उत्पादनांच्या विविध श्रेणी तसेच मसाले उद्योगातील अभिनव तंत्रज्ञान आणि उपाय अधोरेखित करणारे प्रदर्शन देखील आयोजित केले आहे. टेक टॉक, नवीन उत्पादनाचे उद्घाटन आणि कुकरी शो ची सत्रे देखील या निमित्ताने होणार आहेत.

या परिषदेनिमित्त खालील विशेष कार्यक्रमांचा समावेश

  • अवॉर्ड नाइट्स - मसाल्यांच्या निर्यातीतील उत्कृष्ट कामगिरीसाठी पुरस्कारांचे वितरण.
  • स्पाईस एक्सपीरिअन्स झोन.
  • अस्सल भारतीय अनुभव - सांस्कृतिक आणि खाद्यपदार्थ.
  • टेक टॉक सत्र आणि नवीन उत्पादनांची सुरुवात.

मसाले बोर्डाने इंडियन स्पाईस ॲन्ड फूडस्टफ एक्स्पोर्टर्स असोसिएशन, मुंबई , इंडियन पेपर ॲन्ड स्पाईस ट्रेड असोसिएशन, कोची, इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स, कोलकाता आणि फेडरेशन ऑफ इंडियन स्पाईस स्टेकहोल्डर्स, उंझा, गुजरात आणि ऑल इंडिया स्पाईस एक्सपोर्टर्स फोरम (AISEF) सारख्या भारतातील मसाला व्यापार संघटनांच्या सक्रिय सहभागाने जागतिक मसाले परिषदेचे आयोजन केले आहे. 

जागतिक मसाले परिषद २०२३ मध्ये केवळ नोंदणीकृत प्रतिनिधींनाच सहभागी होता येईल, इच्छुक www.worldspicecongress.com या लिंकवर ऑनलाईन नोंदणी करु शकतात.
 

Web Title: The 14th World Spice Conference will be held in Navi Mumbai from September 15 to 17

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.