सध्या सर्वत्र साखर कारखान्यांचा गळीत हंगाम अंतिम टप्प्यात असून, ऊस तोडणी जोमाने सुरू आहे. अनेक कारखान्यांनी ऊस दराच्या पहिल्या उचलीपोटी २८०० रुपयापर्यंत ऊसदर दिला आहे.
परंतु साखर कारखान्यांच्या ऊस दराच्या तुलनेत आता गूळ निर्मितीसाठी गुऱ्हाळघरांवर गाळप होत असलेल्या उसाला प्रतिटन सुमारे तीन हजार सातशे रुपये दर मिळत आहे.
त्यामुळे सध्यातरी कारखान्यांपेक्षा गुऱ्हाळघरेच लय भारी ठरत आहेत, त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे. गुऱ्हाळघरांवर गाळप होत असलेल्या उसाला तीन प्रतिटन सुमारे हजार सातशे रुपये दर मिळत आहे.
दौंड तालुक्यात उसाचे आगर म्हणून प्रसिद्ध असलेल्या राहूबेट परिसरात यंदाच्या हंगामामध्ये गुऱ्हाळघरावर गूळ निर्मितीसाठी गाळप करण्यात येत असलेल्या उसाची मागणी वाढत आहे.
सध्या गुळाच्या बाजारभावामध्ये वाढ होत असल्याने गुढीपाडव्यापर्यंत आगामी दिवसांत उसाचा प्रतिटन दर हा सुमारे चार हजार रुपयांच्या पुढे देखील पोहचण्याची शक्यता आहे.
३ ते ३६०० रुपये दरगूळ सध्या तीन ते ३६०० रु. क्विंटलच्या आसपास विकला जात असून, उन्हाची तीव्रता वाढल्याने सरासरी गूळ उताराही वाढत आहे.
शेतीमध्ये मशागतीचा खर्च, उसाचे बेणे, खताच्या वाढलेल्या किमती, मजुरीचे वाढलेले दर याचा विचार करता सध्या मिळत असलेला भाव समाधानकारक आहे. मात्र, जास्तही नाही. - संजय चव्हाण, शेतकरी