Join us

Sugarcane Farming : वकील करतायत उसाची शेती; एका उसाचे वजन भरलं साडेचार किलो

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2024 17:04 IST

वकील सी. बी. कोरे यांनी रेंदाळ येथील शेतात एक ऊस ५१ पेरांचा व ४ किलो ५०० ग्रॅम वजनाचा उत्पादन केला आहे.

कोल्हापूर : वकील सी. बी. कोरे यांनी रेंदाळ येथील शेतात एक ऊस ५१ पेरांचा व ४ किलो ५०० ग्रॅम वजनाचा उत्पादन केला आहे. शेताची उभी-आडवी नांगरण, रोटावेटर, शेणखत, ताग, हरभऱ्याचा बेवड यांचा अंतर्भाव शेतीत करता आहेत.

थोडेफार रासायनिक खत व जिवामृत वापरून पाण्याचे योग्य नियोजन करून ऊस पिकाची काळजी घेतल्याने २०२० ला एकरी ११३ टन उत्पादन घेतले होते.

याचे श्रेय त्यांनी कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर साखर कारखान्यास तसेच कारखान्यामार्फत मिळणारे मार्गदर्शन व सुविधा, आष्टा येथील शेतीतज्ज्ञ सुरेश कोळी यांच्यामुळे मिळाल्याचे सांगितले.

माती व देशी गाईंचे केलेले पालन-पोषण व गोमूत्र व शेणखत यामुळेच हे यश मिळाल्याचे कोरे यांनी सांगितले. २०२० साली एकरी ११३ टन उसाचे विक्रमी उत्पादन घेतल्याबद्दल त्यांना जवाहर कारखान्याने रोख बक्षीस व पारितोषिक देऊन सन्मानित केले होते.

पारंपरिक पद्धतीने त्यांनी केलेल्या शेतीतून ७० ते ८० वर्षांपूर्वीचे देशी बियाण्यांचे संवर्धन करून आपल्या शेतात मोतीचूर, देशी कार जोंधळा, पसऱ्या शेंगा, काटे भेंडी, अशी सर्व प्रकाराची कडधान्ये, पालेभाज्या यांचे विनाऔषधी उत्पादन घेत आहेत.

नियोजनबद्ध तसेच नवतंत्रज्ञानाचा वापर करून शेती केल्यास निश्चित यश मिळते, असे अॅड. सी. बी. कोरे यांनी सांगितले.

अधिक वाचा: जुन्नरच्या कॉम्प्युटर इंजिनिअरने लावली बारटोक वांगी अन् करून दाखविली नोकरीपेक्षा शेती भारी

टॅग्स :ऊससाखर कारखानेशेतकरीशेतीपीक