सोलापूर : पहिल्या पंधरवड्याचेही बिल अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले नसताना अनेक साखर कारखान्यांनी साखर आयुक्तांना दिलेल्या अहवालात पैसे दिल्याचे दाखविल्याचे दिसत आहे.
श्री. सिद्धेश्वर सोलापूर व श्री. सिताराम महाराज खर्डी या साखर कारखान्यांनी मात्र खरी माहिती दिली आहे. दोन महिन्यांत १,४८५ कोटी ऊस उत्पादकांना दिल्याचे, तर २९३ कोटी रुपये देय असल्याचे रिपोर्टवरून दिसत आहे.
सोलापूर जिल्ह्यात डिसेंबरपर्यंत ३३ साखर कारखाने सुरू असल्याचे साखर आयुक्त कार्यालयाकडे दिसत आहे. नोव्हेंबर महिन्यात सुरू झालेल्या साखर कारखान्यांच्या ऊस गाळपाला काही दिवस दराचा अडथळा आला होता.
मात्र, ऊस गाळप वेगाने सुरू आहे. जिल्ह्याचे ऊस गाळप एक कोटीच्या जवळपास झाले आहे. ऊस तोडणीनंतर १४ दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करणे बंधनकारक असले, तरी किमान एक महिन्यात तरी ऊस बिल मिळणे अपेक्षित आहे.
आतापर्यंत तीन पंधरवड्यांचे ऊस बिल कारखान्यांनी जमा करणे आवश्यक होते. काही कारखान्यांनी तीन पंधरवड्यांचे पैसे जमा केले असले, तरी अनेक कारखान्यांनी पहिल्या पंधरवड्याची बिलेही जमा केली नाहीत.
साखर सहसंचालक कार्यालयाच्या अहवालात १,४८५ कोटी रुपये ऊस उत्पादकांच्या खात्यावर जमा केल्याचे, तर २९३ कोटी रुपये देणे असल्याचे दिसत आहे.
कुणी दिली किती पैसे?श्री. पांडुरंग श्रीपूरने १२६ कोटीश्री. संत दामाजीने २७ कोटीसहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील ११४ कोटीविठ्ठलराव शिंदे पिंपळनेर २३० कोटीश्री. संत कुर्मदास २ कोटीलोकनेते बाबुराव पाटील अनगर २३ कोटीसासवड माळीनगर ३९ कोटीलोकमंगल बीबीदारफळ ११ कोटीलोकमंगल भंडारकवठे २२ कोटीओंकार शुगर म्हैसगाव ४१ कोटीसिध्दनाथ शुगर ६ कोटीजकराया शुगर ३७ कोटीइंद्रेश्वर शुगर १० कोटीभैरवनाथ लवंगी २३ कोटीयुटोपियन शुगर १४ कोटीराजवी अॅग्रो आलेगाव ३२ कोटीबबनराव शिंदे तुर्कपिंपरी ८३ कोटीओंकार शुगर चांदापुरी ७२ कोटीजयहिंद ५३ कोटीओंकार तडवळ ८० कोटीविठ्ठलराव शिंदे करकंब ८० कोटीआष्टी शुगर ५२ कोटीभीमा टाकळीसिकंदर ११ कोटीसहकार शिरोमणी वसंतराव काळे १३ कोटीधाराशिव १८ कोटीश्री. शंकर सहकारी ४१ कोटीअवताडे शुगर ३५ कोटीश्री. विठ्ठल गुरसाळे १० कोटीयेडेश्वरी शुगर २७ कोटीकमलाभवानी करमाळा ४५ कोटीशिवगिरी विहाळ १५ कोटी असे १४८५ कोटी रुपये एफआरपीप्रमाणे दिले असल्याचे अहवालात दिसत आहे.श्री. सिद्धेश्वरचे ४२.३३ कोटी, सिताराम महाराजने ३२.४७ कोटी इतकी एफआरपीची संपुर्ण रक्कम दिली नसल्याचे दिसत आहे.
अधिक वाचा: पुणे जिल्ह्याला मागे टाकत सर्वाधिक ऊस गाळप करण्यात 'हा' जिल्हा आला राज्यात टॉपवर
Web Summary : Solapur factories report sugarcane bill payments, some showing payments not yet made to farmers. ₹1,485 crore paid, ₹293 crore still due. Many factories have deposited the payments.
Web Summary : सोलापुर कारखानों ने गन्ना बिल भुगतान की रिपोर्ट दी, कुछ में किसानों को अभी तक भुगतान नहीं दिखाया गया। ₹1,485 करोड़ का भुगतान, ₹293 करोड़ अभी भी बकाया। कई कारखानों ने भुगतान जमा कर दिया है।