Join us

सजावटीसाठी वापरल्या जाणाऱ्या सूर्यफूल शेतीचा यशस्वी प्रयोग; वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 17:13 IST

मावळ तालुका प्रामुख्याने भात शेतीसाठी आणि गुलाबाच्या फुलांसाठी ओळखला जातो. आता पवन मावळातील सडवली येथील तरुण शेतकरी धीरज रामदास थोरवत यांनी चायनीज सूर्यफुलाची शेती केली आहे.

योगेश घोडकेशिवणे मावळ: मावळ तालुका प्रामुख्याने भात शेतीसाठी आणि गुलाबाच्या फुलांसाठी ओळखला जातो. आता पवन मावळातील सडवली येथील तरुण शेतकरी धीरज रामदास थोरवत यांनी चायनीज सूर्यफुलाची शेती केली आहे.

सूर्यफूल बहुगुणी तेलबिया पीक असून, या फुलांचा वापर सजावटीसाठी आणि बुके बनविण्यासाठी देखील मोठ्या प्रमाणात केला जातो. दोन ते अडीच महिन्यांत फुले येतात. १ महिन्यापयर्यंत सूर्यफुलाचा ताजेपणा टिकून राहतो.

डिसेंबर ते मेमध्ये लागवडसूर्यफूल बियाण्याच्या एका पॅकेटमध्ये १,००० ते १,०५० बियाणे असतात. डिसेंबर ते मे दरम्यान लागवड करता येते. बियाणे पुणे तसेच मुंबई मार्केटमधून घेता येतात.

मशागत कालावधी व वैशिष्ट्येसूर्यफुलाचा ताजेपणा एक महिन्यापर्यंत टिकून राहतो. सूर्यफुलाची लागवड सप्टेंबर ते नोव्हेंबर अखेरपर्यंत करता येते. उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात फुले येण्यासाठी जानेवारी ते जून या कालावधीत बियाणे यशस्वीरीत्या पेरणी करता येते.

असे आहेत भावसूर्यफुलाला ७० ते ८० रुपये प्रतिबंच भाव मिळतो. एका बंचमध्ये पाच फुलांचा समावेश असतो. उन्हाळ्याच्या कालावधीत प्रतिबंच ३०० ते ३५० रुपयांपर्यंत भाव मिळतो. तसेच यासाठी लागणारी बियाणे पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमधून उपलब्ध होतात, अशी माहिती शेतकरी धोखत यांनी दिली.

अधिक वाचा: PM Kisan Hapta : किसान सन्मान निधी योजनेच्या १९ व्या हप्त्याची तारीख ठरली; कधी मिळणार हप्ता?

टॅग्स :सुर्यफुलफुलशेतीफुलंशेतीशेतकरीपीकमावळपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीबाजार