Join us
Daily Top 2Weekly Top 5

Subsidy For Buying Buffalo : 'या' दूध संघाच्या सभासद दूध उत्पादकांना म्हैस खरेदीसाठी मिळणार ४२ हजार अनुदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2024 13:04 IST

दूध संघामार्फत मेहसाणा व मुऱ्हा म्हशी खरेदी करून संघाच्या कार्यस्थळावर विक्रीकेंद्र उभारण्यात येणार आहे. या केंद्रातून म्हैस खरेदी करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना ४२ हजार रुपयांचे अनुदान देण्याची घोषणा संघाचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे यांनी वार्षिक सभेत केली.

वारणा दूध संघामार्फत मेहसाणा व मुऱ्हा म्हशी खरेदी करून संघाच्या कार्यस्थळावर विक्रीकेंद्र उभारण्यात येणार आहे. या केंद्रातून म्हैस खरेदी करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना ४२ हजार रुपयांचे अनुदान देण्याची घोषणा संघाचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे यांनी वार्षिक सभेत केली. देशातील हे पहिलेच केंद्र असेल, असे कोरे यांनी सांगून संघामार्फत दूध संघास सुमारे ७९ कोटींचा ढोबळ नफा झाल्याचे सांगितले. 

वारणानगर येथील वारणा सहकारी दूध उत्पादक संघाच्या गुरुवारी झालेल्या ५६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत कोरे बोलत होते. डॉ कोरे म्हणाले, दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुग्ध व्यवसायास चालना मिळावी, यासाठी जातिवंत म्हैस संवर्धन व पैदास कार्यक्रमराबविला जात आहे. या केंद्रावर सुमारे ४०० ते ५०० म्हशींचा गोठा तयार करण्यात येणार आहे. परराज्यांतून मेहसाना व मुऱ्हा जातींच्या म्हशी तात्यासाहेब कोरेनगर येथील वारणा दूध संघाच्या ५६८ या वार्षिक सभेत संघाचे अध्यक्ष आमदार मार्गदर्शन केले.

यावेळी दूध उत्पादक सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. संघामार्फत खरेदी केली जाणार आहेत, यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना म्हशी खरेदी करण्यासाठी लागणारा वेळ, वाहतूक खर्च व होणारी फसवणूक टळणार आहे. दूध संस्था कमिशनमध्ये प्रतिलिटर ४० पैशांची वाढ केली जाणार आहे. 

वारणेचे दूध भारतीय सैन्यदलात, आदिवासी आश्रमशाळेतील मुलांना सुगंधी दुधाचा पुरवठा, मेट्रो, शताब्दी, राजधानी एक्स्प्रेस व वंदे भारत एक्सप्रेस या रेल्वेमध्ये वारणाची उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध केली असून, मुंबई येथील महानगरपालिकेच्या रुग्णालयात दूधपुरवठा करण्याचे टेंडर मिळाल्याचे डॉ. कोरे यांनी सांगून रिलायन्सर, डी-मार्ट या मॉलच्या माध्यमातून सुमारे १९ कोटींची विक्री झाल्याचे सांगितले.

देशाच्या अनेक राज्यांमध्ये 'वारणेची उत्पादने बाजारपेठेत विक्रीसाठी आणणार असल्याचे कोरे यांनी सांगून वारणा ब्रॅंडचे नाव वेगाने वाढेल, असेही सांगितले. संघाचे कार्यकारी संचालक मोहन येडूरकर यांनी स्वागत केले. माजी कर्मचारी अरुण कुंभार, रंजना माने, यांनी गायिलेल्या सहकारगीताने सभेची सुरुवात झाली. उपाध्यक्ष एच. आर. जाधव यांनी श्रद्धांजलीचा ठराव मांडला.

यावेळी दूध संघाचे उपाध्यक्ष एच. आर. आधव, कारखान्याचे उपाध्यक्ष प्रतापराव पाटील, बँकेचे संचालक प्रमोदराव कोरे आदी उपस्थित होते. शीतल बसरे यांनी सूत्रसंचालन केले. संचालक शिवाजीराव कापरे यांनी आभार मानले.

हेही वाचा - Dragon Fruit Success Story : ड्रॅगन फ्रूट मधून मिळाली उभारी; घर, गाडीसह ओळख मिळाली भारी

टॅग्स :दुग्धव्यवसायदूधशेतकरीशेतीशेती क्षेत्र