शेवगाव तालुक्यात एकूण ११३ गावे असून, महाराष्ट्र शासनाकडील निर्देशानुसार सर्व शेतकरी बांधवांनी स्वतः चे शेतामध्ये जाऊन स्वतः ई-पीक पाहणी अॅपद्वारे पिकाची नोंदणी करणे आवश्यक आहे. अनुदान, नुकसान भरपाई मिळविण्यासाठी ई-पीकपेरा नोंद आवश्यक असल्याने महसूल विभागाकडून जनजागृती करण्यात येत आहे तर शेतकऱ्यांसमोर ई-पीक पेरा नोंदणीचे आव्हान आहे.
सध्याच्या अनियमित मौसमी वातावरणामुळे पिकांची अवस्था वाईट होत आहे. येत्या काळात या वातावरणात बदल झाला नाही तर सरकारकडून पिकांची नुकसान भरपाई किंवा अनुदान देण्याची घोषणा झाल्यास ज्या शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी ॲपद्वारे पीक पेऱ्याची नोंद केली आहे अशाच शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. त्यामुळे ३० ऑगस्टपर्यंत ई-पीक पेरा नोंदणीचे आवाहन प्रशांत सांगडे यांनी केले आहे.
सरकारने जाहीर केलेले शासकीय अनुदान व नुकसान भरपाई मिळविण्यासाठी ई-पीक पाहणी अॅपद्वारे ई-पीक पेरा नोंद केलेली असणे गरजेचे आहे. याकामी शेतकयांना अडचणी आल्यास गावातील तलाठी, कृषी सहायक, मंडळ कृषी अधिकारी, मंडलाधिकारी, तालुका कृषी अधिकारी व तहसील कार्यालय शेवगाव यांच्याशी संपर्क साधावा. - प्रशांत सांगडे, तहसीलदार, शेवगाव