Join us

Soybean Lagwad : यंदा सोयाबीनचे लागवड क्षेत्र घटणार; लागवड करावी का नको?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2025 10:58 IST

यंदा सोयाबीनची लागवड २ लाख हेक्टरने कमी होणार असल्याची माहिती राज्य कृषी विभागाने दिली आहे. मागील वर्षीच्या कमी उत्पन्नामुळे यंदा सोयाबीन घ्यावे की नाही, अशी द्विधा मनस्थिती शेतकऱ्यांची झाली आहे.

मुंबई : यंदा सोयाबीनची लागवड २ लाख हेक्टरने कमी होणार असल्याची माहिती राज्य कृषी विभागाने दिली आहे. मागील वर्षीच्या कमी उत्पन्नामुळे यंदा सोयाबीन घ्यावे की नाही, अशी द्विधा मनस्थिती शेतकऱ्यांची झाली आहे.

शाश्वत उत्पन्न देणाऱ्या नगदी पिकांमध्ये समावेश असलेल्या सोयाबीनला यंदा फारसा प्रतिसाद मिळण्याची शक्यता नाही.

शेतकऱ्यांनी आरोप केला की, केंद्र सरकारने सोयाबीन केक आयातीला परवानगी दिल्याने आणि हमीभावाने खरेदी करण्यास टाळाटाळ केल्याने बाजारात दर कोसळले.

अहिल्यानगरचे शेतकरी श्रीनिवास कडलग म्हणाले, मागील वर्षी सोयाबीनसाठी हमीभाव ४,८९२ रुपये प्रति क्विंटल होता, पण बाजारात प्रत्यक्ष दर ३,९०० ते ४,४०० रुपयांपर्यंतच मिळाला. व्यापारी याच परिस्थितीचा गैरफायदा घेतात.

कोणत्या बियाण्याची किती उपलब्धता?

बियाणेगरजउपलब्ध
सोयाबीन१३.२५ लाख क्विंटल१३.२५ लाख क्विंटल
कापूस८२ हजार क्विंटल१.२२ लाख क्विंटल
भात२.१९ लाख क्विंटल२.९२ लाख क्विंटल

सध्या किती खत उपलब्ध?मंजूर कोटा - ४६.८२ लाख टनसध्या साठा - २५.५७ लाख टनमागील खरीप हंगामात खतांचा वापर - ४४.३० लाख टन

अधिक वाचा: नक्की मान्सून आलाय का? पेरणीचे नियोजन करावे का? जाणून घ्या सविस्तर

टॅग्स :सोयाबीनमहाराष्ट्रपेरणीकेंद्र सरकारखतेराज्य सरकारशेतकरीशेतीअहिल्यानगरखरीप