Join us

Sarpdansh : पावसाळ्यात सर्पदंशाचा सर्वाधिक धोका; साप चावला तर काय कराल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 13:37 IST

Sarpdansh पावसाळ्यात अनेक ठिकाणी सापांचा वावर असतो. त्यामुळे जंगलांशेजारी किंवा गावात राहणाऱ्या लोकांना, शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांना सापाचा धोका सर्वाधिक असतो.

पावसाळ्यात अनेक ठिकाणी सापांचा वावर असतो. त्यामुळे जंगलांशेजारी किंवा गावात राहणाऱ्या लोकांना, शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांना सापाचा धोका सर्वाधिक असतो.

काही लोक साप चावला की, घरगुती उपाय करतात. काही लोक तर, अंधश्रद्धेला बळी पडून साप चावलेल्या जागेवर मंत्रोच्चार करतात. ज्यात त्यांचा जीवही जाऊ शकतो.

त्यामुळे हे सर्व उपाय करण्यात वेळ न घालवता साप चावल्यावर त्वरित रुग्णालय गाठावे, असा सल्ला तज्ज्ञ देतात. पावसाळ्यात साप चावण्याच्या रुग्णांची संख्या जास्त असते. यामुळे शेतकऱ्यांनी व नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे.

तीन प्रकारचे विषसापांमध्ये हिमोटॉक्सिक, न्यूरोटॉक्सिक आणि मायोटॉक्सिक, असे ३ प्रकारचे विष असते. हिमोटॉक्सिक विष रक्त पेशींवर हल्ला करते.

साप चावल्यावर दिसून येणारी लक्षणेसाप चावलेल्या व्यक्तीच्या शरीरातून विविधमार्गे रक्तस्त्राव होणे, तिला रक्ताच्या उलट्या होणे, अशी लक्षणे दिसून येतात. तर, न्यूरोटॉक्सिक विष मज्जासंस्थेवर हल्ला करते.

रुग्णालयात उपचारसाप चावल्यास घरगुती स्वरूपाचे उपचार न करता थेट रुग्णालय गाठावे. उपजिल्हा रुग्णालय, सरकारी दवाखाने याठिकाणी विषारी साप चावल्यास उपचार केले जाते. लस देखील उपलब्ध आहेत.

काय काळजी घ्यावी?- आवाज केल्याने साप निघून जाईल. साप चावल्यानंतर नागरिकांनी घाबरून जाऊ नये, धीर धरावा.- कोणत्याही भोंदू बाबाच्या सांगण्यानुसार कोणतीच कृती करू नये.- रुग्णाला तत्काळ शासकीय रुग्णालयात प्राथमिक उपचार घ्यावे.

उपजिल्हा रुग्णालयात पुरेशा लसी उपलब्ध आहेत. सर्पदंशाच्या घटना घडल्यास घरगुती उपचार न करता थेट उपजिल्हा रुग्णालय गाठून वैद्यकीय उपचार घ्यावे.

अधिक वाचा: शेतकऱ्यांनो आता फक्त 'हा' ओळख क्रमांक सांगा; अर्जाला मिळेल लगेच मंजुरी

टॅग्स :सापशेतकरीपाऊसमोसमी पाऊसडॉक्टरसरकारऔषधंहॉस्पिटल