Join us
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाळ्यात बाहेर झोपताय? सावधान! सुरु झालाय 'या' सापांचा मिलनकाळ; कशी घ्याल काळजी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 13:24 IST

snake bite साप थंड प्रकृतीचा सरपटणारा प्राणी आहे. उन्हाळा वाढला की तो थंडाव्यासाठी बाहेर पडतो. त्यामुळे उन्हाळा वाढला की साप दिसण्याचे प्रकार वाढतात.

साप थंड प्रकृतीचा सरपटणारा प्राणी आहे. उन्हाळा वाढला की तो थंडाव्यासाठी बाहेर पडतो. त्यामुळे उन्हाळा वाढला की साप दिसण्याचे प्रकार वाढतात.

मात्र, सगळेच साप विषारी नसतात. त्यामुळे त्यांना मारण्याऐवजी सर्पमित्राला बोलावून पकडण्यास सांगा. सर्पमित्र सापाला पकडून नैसर्गिक अधिवासात सोडतील.

उन्हाळ्यात जमिनीचे तापमान वाढून साप बिळाबाहेर पडत असतात. यामुळे लोकवस्तीत त्यांचा वावर वाढत असतो. तसेच नाग व धामण या सापांचा मिलनकाळ असतो. त्यामुळे काळजी घेणे आवश्यक आहे.

उन्हाळ्यात बऱ्यापैकी शेतकरी ओट्यावर किंवा जनावरांच्या गोठ्याबाहेर झोपतात. उष्णतेमुळे घराबाहेर झोपताना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

थंडगार ठिकाणी वावर◼️ सापाला अति गारवा आणि अति उष्णताही सहन होत नाही.◼️ तो थंड रक्ताचा असून त्याची त्वचाही नाजूक असते.◼️ त्यामुळे त्याला अति उष्णताही सहन होत नाही.◼️ म्हणून तो गाव्यासाठी घराचा आश्रय घेण्यासाठी येऊ शकतो.◼️ त्यामुळे लोकवस्ती आणि थंडगार ठिकाणी सापांचा वावर वाढलेला उन्हाळ्यात दिसून येतो.

वाढत्या उष्णतेमुळे साप बिळाबाहेर◼️ सापाला उष्णता सहन होत नाही.◼️ त्यामुळे उन्हाचा कडाका वाढला की साप सुरक्षिततेसाठी थंड भागाकडे जातात.◼️ उन्हाळ्यात रात्री साप थंड जागेचा आधार घेतात.◼️ त्यामुळे पाण्याच्या ठिकाणी किंवा रात्री रस्त्यावर गारव्यासाठी येतात.◼️ काही वेळा दिवसाचेही साप बाहेर पडलेले दिसतात.

काय काळजी घ्यावी?◼️ रात्रीच्यावेळी घरातून बाहेर पडताना चांगला टॉर्च सोबत ठेवावा.◼️ त्यामुळे रस्त्यात साप आल्यास तो वेळीच दिसू शकेल.◼️ उन्हाळ्यात एखाद्या झाडाखाली बसताना तेथील जागा स्वच्छ असल्याची खात्री करून घ्या.◼️ अडगळीच्या ठिकाणी साप असण्याची शक्यता असते. त्यामुळे काळजी घेणे आवश्यक आहे.

सर्वच साप विषारी नसतात◼️ सगळेच साप विषारी नसतात.◼️ अनेक जिल्ह्यात विषारी आणि बिनविषारी सापाच्या मिळून सुमारे २२ प्रजाती आढळतात.◼️ त्यापैकी नाग, घोणस, मण्यार आणि फुरसे असे साप विषारी आहेत.◼️ त्यामुळे प्रत्येक साप विषारी असेल, असे समजून त्याला मारू नका

दंश झाल्यास डॉक्टर गाठा◼️ एखाद्या वेळी सापाचा दंश झाल्यास तत्काळ तज्ञ डॉक्टर गाठा.◼️ त्यांच्याकडून योग्य उपचार करून घ्या.◼️ घरगुती उपचार करण्यात वेळ दवडू नका.◼️ अन्यथा प्राणावर बेतण्याची जास्त शक्यता असते.◼️ त्यामुळे नेहमी सजगपणे विचार करण्याची गरज असते.

साप दिसला तर..◼️ सर्वच साप विषारी नसतात त्यामुळे साप दिसताच त्यांना भीतीने मारू नका.◼️ सर्पमित्राला बोलावून त्याला पकडून द्या.◼️ त्यामुळे त्याला जीवदान मिळेल आणि सापांच्या जाती वाचविण्यात मदत होईल.◼️ साप हा निसर्ग साखळीतील महत्त्वाचा घटक आहे.

अधिक वाचा: आता लाईट बिल येणार कमी; १ एप्रिलपासून १ ते १०० युनिट वापरासाठी वाचा किती असेल दर?

English
हिंदी सारांश
Web Title : Beware sleeping outside! Snake mating season starts; take precautions.

Web Summary : Snakes seek cool places in summer, increasing sightings. Most aren't venomous. Avoid killing; call a snake rescuer. Take care sleeping outdoors. Use a torch at night. If bitten, seek immediate medical attention. Don't panic; many snakes are harmless.
टॅग्स :सापतापमानहवामान अंदाजडॉक्टरशेतीशेतकरी