Join us

कृषि विज्ञान केंद्रात कृषी यांत्रिकीकरणावर आधारित कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम

By रविंद्र जाधव | Updated: November 6, 2024 22:37 IST

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी आणि सीएनएच (न्यू हॉलंड) इंडस्ट्रियल इंडिया, नवी दिल्ली यांच्या व्यावसायिक सामाजिक जबाबदारीच्या माध्यमातून, शेतकरी आणि ग्रामीण युवक-युवतींसाठी कृषी यांत्रिकीकरणावर आधारित कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम कृविकें बदनापूर (जालना-२) द्वारा मंगळवारी (दि.०५) आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन ऑनलाइन पद्धतीने करण्यात आले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी आणि सीएनएच (न्यू हॉलंड) इंडस्ट्रियल इंडिया, नवी दिल्ली यांच्या व्यावसायिक सामाजिक जबाबदारीच्या माध्यमातून, शेतकरी आणि ग्रामीण युवक-युवतींसाठी कृषी यांत्रिकीकरणावर आधारित कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम कृविकें बदनापूर (जालना-२) द्वारा मंगळवारी (दि.०५) आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन ऑनलाइन पद्धतीने करण्यात आले.

यावेळीशेतीच्या यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी ट्रॅक्टर आणि ट्रॅक्टर-चलित यंत्रसामग्रीचा उपयोग कसा करावा या विषयावर कृषि विज्ञान केंद्र, बदनापुर (जालना-२) द्वारे दि. ०४ ते ०६ नोंव्हेंबर, २०२४ आणि दि. ०७ ते ०९ नोंव्हेंबर, २०२४ दरम्यान दोन वेगवेगळे असे तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले  आहेत. सदरील प्रशिक्षणामध्ये यंत्रसामग्रीच्या वापराबाबत तसेच त्यासाठी लागणारे सुरक्षा उपाय, तंत्रज्ञानाचे अपडेट्स, तसेच यंत्रसामग्रीच्या खरेदीसाठी उपलब्ध अनुदान योजनांची माहिती देण्यात आली.

कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून व.ना.म.कृ.वि. परभणीचे कुलगुरु डॉ. इन्द्र मणि तसेच विस्तार शिक्षण वनामकृवि परभणीचे संचालक डॉ. भगवान आसेवार आणि सीएनएच प्रकल्प नोडल अधिकारी डॉ. उदय खोडके आदी उपस्थित होते. तर कार्यक्रमाला शेतकऱ्यांबरोबरच केव्हीके बदनापूरचे प्रमुख शास्त्रज्ञ प्रा. गीता यादव, डॉ. राकेश अहिरे, डॉ. स्मिता सोलंकी हे देखील उपस्थित होते. 

यावेळी कार्यक्रम समन्वयक तथा वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. एस. डी. सोमवंशी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना सांगितले की, शेतकऱ्यांना ट्रॅक्टर चालवण्याचे तंत्र, ट्रॅक्टर-चलित यंत्रसामग्रीचा योग्य वापर, सुरक्षा उपाययोजना इत्यादी विषयांवर प्रशिक्षण दिले जाणार आहे. याशिवाय, शेतकऱ्यांना यंत्रसामग्रीच्या खरेदीसाठी आवश्यक असलेल्या अनुदानांची माहितीही देण्यात येणार आहे.

या कार्यक्रमामुळे शेतकऱ्यांना शेतीचे काम सुकर होईल, उत्पादन वाढेल आणि त्यांचे उत्पन्नही वाढेल, अशी अपेक्षा आहे. यांच्याशी संपर्क साधून अधिक माहिती मिळवू शकता. तर तांत्रिक सत्रात शास्त्रज्ञ (कृषि अभियांत्रिकी) केव्हीके, औरंगाबाद-१ प्रा. गीता यादव यांनी बी.बी.एफ. तंत्रज्ञान आणि कॉटन श्रेडर विषयी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच सदरील यंत्र सामुग्रीचे प्रातेक्षिक करून दाखवले.

यासोबतच व.ना.म.कृ.वि. परभणीचे कुलगुरु डॉ. इन्द्र मणि यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात शेतकऱ्यांनी यंत्रसामग्रीचा वापर करून शेतीचे कार्य सुकर करण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आर. एल. कदम यांनी केले.

हेही वाचा : Honey Health Benefits : मधाळ मधाचे आरोग्यदायी फायदे

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेतीजालनातंत्रज्ञानपीक व्यवस्थापन