Join us

sericulture farming: मराठवाड्यात वर्षभरात ३१२५ टन रेशीमचे उत्पादनातून शेतकऱ्यांचे स्वप्न साकार वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2025 10:46 IST

Sericulture Farming: पारंपरिक शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे मराठवाड्यातील शेतकरी हळूहळू रेशीम (तुती लागवड) शेतीकडे वळू लागले आहेत. मराठवाड्यातील ११ हजार शेतकऱ्यांनी पाहिलेले रेशीम शेतीचे स्वप्न प्रत्यक्षात उतरले आहे. (Sericulture Farming)

बापू सोळुंके

पारंपरिक शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे मराठवाड्यातील शेतकरी हळूहळू रेशीम (तुती लागवड) शेतीकडे वळू लागले आहेत. मराठवाड्यातील ११ हजार शेतकऱ्यांनी पाहिलेले रेशीम शेतीचे स्वप्न प्रत्यक्षात उतरले आहे. (Sericulture Farming)

या शेतकऱ्यांनी वर्षभरात ३ हजार १२५ मे. टन रेशीम कोष उत्पादन घेतले आहे. शासनाच्या रेशीम विभागाकडून शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यात येते. रेशीम शेतीसाठी अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांना मग्रारोहयोअंतर्गत ८९५ दिवसांची मजुरी देण्यात येते. (Sericulture Farming)

यासोबतच शेड उभारणे, रोप, अन्य साहित्य खरेदीसाठी १ लाख २१ हजार रुपये देण्यात येतात. जे शेतकरी मग्रारोहयो मधून रेशीम शेती करण्यास उत्सुक नाहीत, त्यांच्यासाठी शासनाने अन्य योजना आणलेली आहे. त्यांनाही रेशीम शेती करण्यासाठी वर्षभरात सुमारे ३ लाख ७५ हजार रुपये अनुदान देण्यात येते. (Sericulture Farming)

मराठवाड्यातील शेतकरी रेशीम शेतीकडे वळत आहेत. मराठवाड्यातील ११ हजार १८६ शेतकऱ्यांनी ११ हजार ६४३ एकरवर रेशीम शेती सुरू केली. मागील वर्षभरात मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी ३,१२५ मे. टन रेशीम कोषाचे उत्पादन घेतल्याची माहिती जिल्हा रेशीम अधिकारी बी. डी. डेंगळे यांनी दिली.

बीड राज्यात अव्वल

राज्यातील १३ हजार ५९२ शेतकरी रेशीम शेती करतात. यातील ४० टक्के शेतकरी एकट्या बीड जिल्ह्यातील आहेत. बीड जिल्ह्यातील ४, ४५० शेतकरी रेशीम शेती करीत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

रेशीम कोषाला ५०० ते ८०० रुपये प्रति किलो दर

* रेशीम धागा आणि त्यापासून साडी आणि शाल बनविणाऱ्या कारागिरांकडून मागणी असते. जालना येथे आणि कर्नाटक राज्यात रेशीम कोषाची बाजारपेठ आहे.

* यावर्षी रेशीम कोष प्रति किलो ५०० ते ८०० रु. प्रति किलो दराने विक्री झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

४४ लाख ६० हजार अंडीपुंज वाटप

* रेशीम शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाच्या रेशीम विभागाकडून रेशीम अळीचे अंडीपुंज वाटप करण्यात येते.

* गेल्यावर्षी मराठवाड्यातील शेतकऱ्यांना ४४ लाख ६० हजार ४२५ अंडीपुंज वाटप करण्यात आले.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वर्षभरापूर्वी ६२७ शेतकरी रेशीम शेती करीत होते. या शेतीचे महत्त्व लक्षात येताच मागील वर्षभरात आणखी ३९४ शेतकऱ्यांची यात भर पडली. सध्या जिल्ह्यातील १०२० शेतकऱ्यांनी १०५२ एकरवर तुती लागवड केली आहे. - बी. डी. डेंगळे,  जिल्हा रेशीम अधिकारी

हे ही वाचा सविस्तर : Sericulture Farming: राज्यात ४.४ हजार मेट्रिक टन रेशीम कोष उत्पादन; जाणून घ्या काय आहे कारण

टॅग्स :शेती क्षेत्ररेशीमशेतीशेतीशेतकरीमराठवाडा