साप किंवा इतर कुठल्याही वन्यजीव मानवी वस्तीत दिसल्यास तो पकडण्यासाठी कोणी पैसे मागत असल्यास तो गुन्हा आहे. त्यामुळे अशी मागणी करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात येते.
घर किंवा परिसरात सापाला बघून अनेकांचे भांबेरी उडते. अशावेळी ते सर्प मित्राला पाचारण करतात. सामाजिक कार्य म्हणून बहुसंख्य सर्पमित्र साप पकडून त्याला सुरक्षित ठिकाणी सोडतात. परंतु काही जण पैशाची मागणी करत असल्याचे दिसून येत आहे. त्यांच्यावर वनविभागाकडून त्यावर कारवाई होऊ शकते.
वन्यजीवाला वन कायद्यानुसार संरक्षित दर्जा आहे. त्यामुळे वन्यजीवाला पकडण्यासाठी कोणी पैसे मागत असेल तर कायद्याने गुन्हा आहे. एखाद्याने पैसे मागितले आणि त्यासंबंधी नागरिकांनी वनविभागाला तक्रार केली. तर त्यावर वनविभाग कारवाई करू शकते.
स्वयंघोषित सर्पमित्रांची संख्या दिवसेंदिवस जिल्ह्यात वाढत आहे. कोणी पेट्रोलचा खर्च तर कोणी प्रवासाचा खर्च मागतात. मात्र, पैसे मागितल्यास वनविभागाकडे तक्रार करता येते. त्यानुसार सर्पमित्रावर कारवाई होऊ शकते.
वन्यजीव दिसल्यास त्याला सुरक्षितपणे गैरबंद करण्यासाठी वनविभागाला १९२६ टोल फ्री क्रमाकांवर संपर्क करता येते. साप असो या बिबट्या, हरीण अन्य कोणत्याही वन्यजीव संरक्षणासाठी हा क्रमांक वापरू शकतो.
खर्चासाठी पैसे द्यावेत?
सर्पमित्राला प्रवासापोटी आलेला खर्च नक्कीच द्यावा. सर्पमित्रांनीही अवाजवी पैशांची मागणी करू नये, असे मत मानद वन्यजीव रक्षक तेजस ठाकूर यांनी मांडले. तर सर्पाला पकडण्यासाठी स्वखुशीने किंवा खर्चापोटी ठराविक रक्कम माणुसकीपोटी देण्यास हरकत नसल्याचे उपवनसंरक्षक अलिबाग राहुल पाटील यांनी सांगितले.
हेही वाचा : भारतातून कोणकोणत्या कृषी मालांची कुठे होतेय निर्यात? वाचा सविस्तर माहिती