पुणे : राज्यात सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे एकूण ६८ लाख १३ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यात सुमारे सात लाख हेक्टर क्षेत्र शासन निर्णयानुसार विशेष बाब म्हणून समाविष्ट करण्यात आले आहे.
या आपत्तीमुळे तब्बल ८३ लाख शेतकऱ्यांना तडाखा बसला आहे, तर शेतकऱ्यांना नुकसानभरपाई म्हणून ७ हजार ९८ कोटी रुपयांच्या निधीची मागणी राज्य सरकारकडे करण्यात आली आहे.
राज्यात सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीचे नुकसान मोजण्यासाठी तब्बल १७ दिवसांचा कालावधी लागला आहे.
महसूल, कृषी व ग्रामविकास विभागाने केलेल्या पंचनाम्यानुसार ३४ जिल्ह्यांपैकी वर्धा, यवतमाळ, अमरावती, अहिल्यानगर, धुळे व नाशिक या सहा जिल्ह्यांमध्ये राज्य सरकारने जाहीर केलेल्या निकषांपूर्वीच पंचनामे पूर्ण करण्यात आले होते.
त्यामुळे या सहा जिल्ह्यांमध्ये नव्याने पंचनामे पूर्ण करताना विशेष बाब म्हणून दोन हेक्टरची मर्यादा तीन हेक्टरवर करण्यात आली.
त्यानुसार सुमारे ७ लाख २ हजार १९ हेक्टरचे क्षेत्र वाढले आहे. राज्यात गुरुवारअखेर ६१ लाख ११ हजार २२३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले होते.
आता त्यात या ७ लाख २ हजार १९ हेक्टरचे क्षेत्र अंतर्भूत करण्यात आल्यानंतर एकूण नुकसानीचे क्षेत्र ६८ लाख १३ हजार २४२ हेक्टर इतके झाले आहे. या नुकसानीमुळे राज्यातील ८३ लाख १२ हजार ९७० शेतकऱ्यांना तडाखा बसला आहे.
या पंचनाम्यांनुसार राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधीअंतर्गत शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यासाठी राज्य सरकारकडे ७ हजार ९८ कोटी ६८ लाख २१ हजार रुपयांची मागणी करण्यात आली आहे.
आता राज्याचा मदत व पुनर्वसन विभाग यासंदर्भात शासन निर्णय जारी करून शेतकऱ्यांना मदत थेट खात्यावर जमा करणार आहे.
सुधारित आकडेवारी◼️ एकूण बाधित क्षेत्र : ६८,१३,२४२◼️ एकूण बाधित जिल्हे : ३४◼️ एकूण बाधित शेतकरी : ८३,१२,९७०◼️ भरपाई ७०,०९८ कोटी ६८ लाख २१ हजार
राज्यातील सहा जिल्ह्यांसाठी विशेष बाबराज्यात मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यात अतिवृष्टीने पीकांचे नुकसान झाले. त्यातील सहा जिल्ह्यांमध्ये मदतीचे निकष जाहीर करण्यापूर्वीच पंचनामे झाले होते. त्यामुळे या सहा जिल्ह्यांसाठी सरकारने नव्याने पंचनामे पूर्ण करताना विशेष बाब म्हणून २ हेक्टरची मर्यादा ३ हेक्टरपर्यंत केली आहे.
Web Summary : Heavy September rains damaged 68.13 lakh hectares of crops in Maharashtra, impacting 83 lakh farmers. Six districts received special consideration, increasing the hectare limit. The state seeks ₹7,098 crore in compensation from the central government.
Web Summary : महाराष्ट्र में सितंबर में भारी बारिश से 68.13 लाख हेक्टेयर फसलें क्षतिग्रस्त, 83 लाख किसान प्रभावित। छह जिलों को विशेष विचार, हेक्टेयर सीमा बढ़ी। राज्य सरकार ने केंद्र से ₹7,098 करोड़ मुआवजे की मांग की।