Pune : भारतातील पहिलेच रेसिड्यू फ्री म्हणजेच रासायनिक अवशेषमुक्त शेती प्रदर्शन पुण्यातील कृषी महाविद्यालयाच्या फिल्डवर आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे आयोजन ६ मार्च ते १० मार्चच्या दरम्यान आयोजित करण्यात आले असून यामध्ये पुणेकरांना आणि शेतकऱ्यांना विविध गोष्टी पाहायला मिळणार आहेत.
प्रदर्शनीची प्रमुख उद्यिष्टेः
१. शेतकऱ्यांना आणि सामान्य जनतेला कृषिच्या महत्वाबद्दल जाणीव करून देणे, जेणेकरुन खाद्य सुरक्षा आणि पर्यावरणीय शाश्वतता सुनिश्चित करणे.२. सर्वोत्तम पध्दतीचा वापर यशस्वी यशोगाथा, नाविन्यपुर्ण तंत्रज्ञान आणि प्रभावी कृषि पध्दतीचे प्रदर्शन करणे.३. सहकार्य, प्रोत्साहन देणे शेतकरी, कृषि शास्त्रज्ञ, सहकारी संस्था आणि उद्योग प्रमुख यांच्यात स्पर्धायुक्त सहकार्य व मैत्रीपुर्ण वातावरण निर्माण करणे.४. शेतकऱ्यांना सशक्त बनवणे, शेतकऱ्यांना त्यांच्या शेतावर शाश्वत कृषी पध्दती लागू करण्यासाठी आवश्यक कौशल्ये आणि ज्ञान प्रदान करणे.५. विद्यार्थ्यांना विविध कौशल्ये तसेच उद्योजकता विकास करण्यासाठी विविध प्रशिक्षणे आयोजित करणे. विद्यार्थ्यांना विविध उद्योगांमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध करुन देणे
प्रदर्शनातील विभाग १. शेतावर लागवड केलेली 'शाश्वत शेती' यांचे १० एकर क्षेत्रावरील प्रात्यक्षिके२. जमीनीची सुपिकता नैसर्गिक/ सेंद्रिय/ रसायन मुक्त पदार्थांचा वापर करुन वाढविणे याबाबतचे स्टॉल्स आणि याबाबत विद्यापीठाने केलेले संशोधन३. एकात्मिक किड व रोग नियंत्रण याबाबतचे स्टॉल्स आणि याबाबत विद्यापीठाने केलेले संशोधन४. कृषि यंत्रे आणि अवजारे याबाबतचे स्टॉल्स, प्रक्षेत्रावरील प्रात्यक्षिके आणि याबाबत विद्यापीठाने केलेले संशोधन५. शेतीमधील इंटरनेटचा वापर, मोबाईल अॅप, कृषि क्षेत्रामधील ड्रोन आणि कृत्रिम बुध्दीमत्तेचा वापर६. नवउद्योजक आणि हुरहुन्नरी शेतकऱ्यांनी तयार केलेले तंत्रज्ञान७. शेतकरी ग्राहक समन्वय कक्ष आणि प्रत्यक्ष खरेदी विक्री८. कृषिक्षेत्रामध्ये आध्यात्माचा वापर