Join us
Daily Top 2Weekly Top 5

अपात्र ठरविलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा; अखेर अनुदानाच्या पैशाला मिळाली मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 09:15 IST

kanda anudan संबंधित शेतकऱ्यांच्या सात-बारा उताऱ्यावर आवश्यक नोंदी नसल्याने त्यांना शासनाच्या कांदा अनुदान योजनेत अपात्र ठरविण्यात आले होते.

कोपरगाव : तालुक्यातील कांदा उत्पादक २१० शेतकऱ्यांना एकूण ५२ लाख ७१ हजार ६४४ रुपये कांदा अनुदान मंजूर झाले आहे.

संबंधित शेतकऱ्यांच्या सात-बारा उताऱ्यावर आवश्यक नोंदी नसल्याने त्यांना शासनाच्या कांदा अनुदान योजनेत अपात्र ठरविण्यात आले होते.

पाठपुराव्या नंतर अनुदान मंजुर केल्याची माहिती जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी दिली. अहिल्यानगर जिल्ह्यात सन २०२२-२३ या कालावधीत एकूण १,४०७ कांदा उत्पादक शेतकरी अनुदानासाठी अपात्र ठरविण्यात आले होते.

यामध्ये कोपरगाव तालुक्यातील २१० शेतकऱ्यांचा समावेश होता शासन निर्णयानुसार १ फेब्रुवारी २०२३ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समिती तसेच खासगी बाजारात या शेतकऱ्यांनी कांदा विक्री केली होती.

या अन्यायाविरोधात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पणन मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे आणि अहिल्यानगर जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयाकडे पाठपुरावा करण्यात आला.

या प्रयत्नांना यश येत, जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी २७ नोव्हेंबर २०२५ रोजीच्या पत्रान्वये फेरछाननीनंतर अंतिम पात्र लाभार्थ्यांना प्रलंबित कांदा अनुदान वितरित करण्याचे आदेश दिले.

अधिक वाचा: शक्तीपीठ महामार्गाचा मार्ग बदलला; नवीन रेखांकनात जिल्ह्यातील 'या' गावांचा समावेश होणार

English
हिंदी सारांश
Web Title : Relief for Disqualified Onion Farmers: Subsidy Funds Approved Finally

Web Summary : 210 onion farmers in Kopargaon, previously disqualified for subsidy, will receive ₹52.71 lakh. Following appeals, authorities approved pending subsidies after reviewing eligibility for the period of February 2023 to March 2025. The funds are now set for distribution.
टॅग्स :कांदाशेतकरीशेतीकोपरगावअहिल्यानगरजयकुमार गोरेसरकारपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीबँकदेवेंद्र फडणवीस