भूमी अभिलेख विभागातील ‘गट क’ भू-करमापक संवर्गातील ९०३ रिक्त पदे भरण्यासाठी परीक्षेचे आयोजन करण्यात येणार असून १ ते २४ ऑक्टोबर २०२५ पर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
राज्यात भू-करमापक संवर्गातील एकूण १ हजार १६० पदे रिक्त असून त्यापैकी ९०३ पदे सरळसेवेने भरण्यात येणार आहेत.
कुठे किती जागा?पुणे विभागातील ८३ पदेकोकण (मुंबई) विभाग - २५९नाशिक - १२४छ. संभाजीनगर - २१०अमरावती - ११७नागपूर - ११० पदांचा समावेश आहे.
परीक्षेसाठीची पात्रता◼️ मान्यताप्राप्त महाविद्यालयातील किंवा संस्थेकडील स्थापत्य अभियांत्रिकी पदविका (डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरींग) धारक किंवा◼️ माध्यमिक शालांत परीक्षेनंतर मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे सर्वेक्षक व्यवसायाचे प्रमाणपत्र (आयटीआय सर्व्हेअर) धारक उमेदवारांना अर्ज करता येईल.
कुठे कराल अर्ज?उमेदवारांचे अर्ज https://ibpsreg.ibps.in/gomsep25/ आणि https://mahabhumi.gov.in या संकेतस्थळांवर ऑनलाईन स्वीकारण्यात येणार आहेत. सदर भरतीसाठी १३ व १४ नोव्हेंबर २०२५ रोजी ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे.
आयोजित करण्यात येणाऱ्या परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे विभागनिहाय सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल.
त्यानंतर सामाजिक व समांतर आरक्षणानुसार कागदपत्र पडताळणी करून विभागनिहाय अंतिम निवड यादी व प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात येईल, असे राज्याचे जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि अभिलेख डॉ. सुहास दिवसे यांनी कळविले आहे.
अधिक वाचा: ग्रामीण भागात स्वयंरोजगाराची नवी संधी; शेणापासून लाकूड निर्मिती उद्योग, जाणून घ्या सविस्तर
Web Summary : The Land Records Department is recruiting for 903 surveyor positions. Online applications are open from October 1-24, 2025. Eligibility includes a diploma in civil engineering or an ITI surveyor certificate. Apply through mahabhumi.gov.in. Online exams are scheduled for November 13-14, 2025.
Web Summary : भूमि अभिलेख विभाग 903 भू-सर्वेक्षक पदों पर भर्ती कर रहा है। ऑनलाइन आवेदन 1-24 अक्टूबर, 2025 तक खुले हैं। पात्रता में सिविल इंजीनियरिंग में डिप्लोमा या आईटीआई सर्वेयर प्रमाण पत्र शामिल है। mahabhumi.gov.in के माध्यम से आवेदन करें। ऑनलाइन परीक्षाएँ 13-14 नवंबर, 2025 को निर्धारित हैं।