Lokmat Agro >शेतशिवार > RCH Registration: शासकीय योजनांच्या लाभासाठी 'आरसीएच' नोंद केली का ? वाचा सविस्तर

RCH Registration: शासकीय योजनांच्या लाभासाठी 'आरसीएच' नोंद केली का ? वाचा सविस्तर

RCH Registration: Have you registered 'RCH' for the benefits of the government schemes? Read in detail | RCH Registration: शासकीय योजनांच्या लाभासाठी 'आरसीएच' नोंद केली का ? वाचा सविस्तर

RCH Registration: शासकीय योजनांच्या लाभासाठी 'आरसीएच' नोंद केली का ? वाचा सविस्तर

RCH Registration शासनाकडून विविध योजना राबविण्यात येत आहेत. मात्र, या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित मातेला आरसीएच नोंदणी बंधनकारक आहे. जाणून घेऊ या सविस्तर

RCH Registration शासनाकडून विविध योजना राबविण्यात येत आहेत. मात्र, या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित मातेला आरसीएच नोंदणी बंधनकारक आहे. जाणून घेऊ या सविस्तर

शेअर :

Join us
Join usNext

गुणवंत जाधवर

उमरगा :
गर्भवतींनी शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी 'आरसीएच'(RCH) नोंदणी(Registration) आवश्यक आहे. योजना अंमलबजावणीसाठी आरोग्य विभागाने रिप्रॉडक्टिव्ह चाइल्ड हेल्थ अर्थात 'आरसीएच' हे पोर्टल कार्यान्वित केले आहे.

काय आहे आरसीएच?

सरकारी योजनांसाठी आरोग्य विभागाने 'रिप्रॉडक्टिव्ह चाइल्ड हेल्थ' अर्थात आरसीएच हे पोर्टल कार्यान्वित केले आहे. नोंदणीनंतर महिलेला विशिष्ट संकेतांक मिळतो.

पालिकेच्या आरोग्य विभागात होते नोंद

ही नोंदणी केल्यानंतर सदरील माहिती पालिका किंवा आरोग्य विभागाच्या दप्तरी नोंद होते. त्यानुसार योजना लाभाचे नियोजन होते.

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी

आरसीएच पोर्टलवर नोंद केल्यानंतर मातेला व बालकाला मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता निधी योजनेतून मदत मिळते.

महात्मा फुले जनआरोग्य योजना

पोर्टलवर नोंदणीनंतर मातेला व बालकाला महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून वैद्यकीय सेवा विनाशुल्क मिळतात.

प्रधानमंत्री मातृवंदना योजना

आरसीएच पोर्टलवर नोंद केल्यानंतर मातेला प्रधानमंत्री मातृवंदना योजनेची विशिष्ट रक्कम बँक खात्यात जमा केली जाते.

१९९७ पासून कार्यक्रमाची सुरुवात

शिशू, बाल आणि माता मृत्यूदर कमी करण्यासाठी १९९७ मध्ये 'आरसीएच' कार्यक्रम सुरू करण्यात आला. कुटुंब कल्याणाच्या विविध योजनांच्या आणि धोरणांच्या अंमलबजावणीसाठी, समन्वय घडवून आणण्यासाठी आणि पायाभूत सुविधांसाठी हा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.

प्रत्येक गर्भवतीने नोंदणी करावी

गरोदर मातेची प्रसूती सुरक्षित होऊन बाळ सुदृढ जन्मावे, यासाठी जिल्हा स्त्री रुग्णालय प्रशासन काम करत आहे. माता व बालमृत्यू कमी व्हावे, त्यासाठी शासनाकडून विविध योजना राबविण्यात येत आहेत. मात्र, या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित मातेला आरसीएच नोंदणी बंधनकारक आहे. नोंदणीचे आवाहन गर्भवती महिलांनी आरसीएच नोंद करावी, असे आवाहन स्त्री जिल्हा रुग्णालयाच्यावतीने करण्यात आले आहे.

आरसीएस पोर्टलमुळे 'यू विन' हे ॲप चालू झाले आहे. त्यामुळे लाभार्थीचे लसीकरण स्टेटसची माहिती लाभार्थीच्या पालकांना आणि कर्मचाऱ्यांना वेळेवर भेटते. पर्यायाने लाभार्थी लसीकरणापासून वंचित राहत नाही. सर्व लसीकरण पूर्ण होण्यासाठी 'आरसीएस पोर्टल' आणि 'यू विन ॲप'चा महत्त्वाचा रोल आहे. - डॉ. उमाकांत बिराजदार, तालुका आरोग्य अधिकारी, उमरगा

हे ही वाचा सविस्तर :  Janani Suraksha Yojana : जननी सुरक्षा योजनेसाठी अर्ज करताय जाणून घ्या सविस्तर

Web Title: RCH Registration: Have you registered 'RCH' for the benefits of the government schemes? Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.