चारचाकी वाहन असणारे, आयकर भरणाऱ्यांसह वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयांपेक्षा अधिक असलेल्या रेशनकार्डधारक लाभार्थीची जिल्हा पुरवठा विभागाकडून पडताळणी केली जाणार आहे.
राज्य सरकारकडून रेशन लाभार्थ्यांची पडताळणी करण्याची सूचना पुरवठा विभागाला प्राप्त झाली आहे. गरज नसताना मोफत धान्याचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांची शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.
सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब योजनेंतर्गत पात्र रेशनकार्डधारक लाभार्थ्यांना दरमहा रेशन दुकानांतून मोफत धान्याचे वितरण करण्यात येते.
त्यामध्ये आयकर भरणारे, चारचाकी वाहन असलेले, जीएसटी क्रमांक असलेले, एक लाख रुपयापेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असलेल्या लाभार्थ्यांची यादी प्रशासनाकडून तयार करण्याचे काम सुरू आहे.
चारचाकी वाहन असणारे, आयकर भरणाऱ्यांसह वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयांपेक्षा जास्त असलेल्या रेशनकार्डधारक लाभार्थ्यांना मोफत धान्याच्या लाभासाठी अपात्र ठरविण्यात येणार आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आयकर भरणारे, चारचाकी वाहन असलेले, वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयापेक्षा अधिक असलेले, जीएसटी क्रमांक असलेल्या संबंधित रेशनकार्डधारक लाभार्थ्यांना मोफत मिळत असलेल्या धान्याचा लाभ बंद करण्यात येणार आहे.
पडताळणीनंतर धान्य होणार बंद
अपात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांच्या यादीत जिल्ह्यातील हजारो लाभार्थ्यांचा समावेश आहे. यासंबंधी तक्रारी शासनाकडे होत्या. त्यानुसार तपासणी सुरू आहे. पडताळणी केल्यानंतर संबंधित रेशनकार्डधारक लाभार्थ्यांना धान्याच्या लाभातून बाद ठरविणार असल्याची माहिती पुरवठा अधिकाऱ्यांनी दिली.
स्वतःहून बाहेर पडावे
जर तुम्ही रेशनकार्डधारक असाल आणि तुमच्या कुटुंबाचे उत्पन्न वाढले असेल किंवा तुम्हाला आता रेशनची गरज नसेल, तर तुम्ही स्वतःहून रेशन योजनेतून बाहेर पडू शकता. यामुळे, गरजू लोकांना योजनेचा लाभ घेता येईल, असे प्रशासनाकडून आवाहन केले आहे.
पुरवठा इन्स्पेक्टरकडून लाभार्थ्यांची पडताळणी
आयकर भरणारे, चारचाकी वाहन असलेले, वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा जास्त असलेले व जीएसटी क्रमांक असलेल्या लाभार्थी यादीची पडताळणी करून, संबंधित लाभार्थ्यांना दिला जाणारा मोफत धान्याचा लाभ बंद करण्याची कार्यवाही सुरू आहे. तालुकास्तरावर अन्न पुरवठा निरीक्षक लाभार्थ्यांची पडताळणी करणार आहेत.
अधिक वाचा: ई-पीक पाहणी आणि विमा घेतलेले पीक यात तफावत आढळल्यास अशी होणार कारवाई?