शिवाजी पवारश्रीरामपूर : राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेली खरिपातील फुले वसंधुरा हे गोड ज्वारीचे वाण इथेनॉल निर्मिती क्षेत्रात क्रांती घडवणार आहे.
अवघ्या चार महिन्यांच्या या पिकामध्ये साखर व रसाचे प्रमाण आहे. देशातील इथेनॉल निर्मिती क्षेत्रामध्ये क्रांतीची क्षमता असलेल्या गोड ज्वारीला उद्योग जगताच्या प्रतिसादाची अपेक्षा आहे.
हैदराबादस्थित भारतीय भरड धान्य संशोधन संस्थेच्या अखत्यारीत देशभरातील १२ ठिकाणी संशोधन कार्य केले जाते. राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचाही त्यात समावेश आहे.
वरिष्ठ ज्वारी पैदासकार डॉ. जे. व्ही. पाटील, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोलाचे कुलगुरू डॉ. एस. आर. गडाख, डॉ. एम. एस. शिंदे यांनी गोड ज्वारीच्या संशोधनामध्ये यश मिळविले आहे.
दहा वर्षांच्या अथक मेहनतीनंतर २०२१ मध्ये गोड ज्वारीचे वाण विकसित केले गेले. आता त्याला देशभरामध्ये मान्यता देण्यात आली आहे.
phule vasundhara sorghum भरड धान्य संशोधन संस्थेच्या कोइम्बतूर, लुधियाना, धारवाड, अकोला आदी १२ केंद्रांवरही चाचणीपश्चात ते यशस्वी गणले गेले.
७० ते ८० टन उत्पादनअवघ्या चार महिन्यांच्या या ज्वारीचे हेक्टरी ७० ते ८० टनापर्यंत उत्पादन घेता येते, असे महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.उसासारखी १५ ते १६ महिने तोडणी कालावधीच्या तुलनेत हे खूपच किफायतशीर ठरते.
गोड ज्वारीची वैशिष्ट्ये◼️ इथेनॉल निर्मितीला आवश्यक साखरेचे प्रमाण १७ डिग्री ब्रिक्स फुले वसुंधरामध्ये आहे.◼️ त्याशिवाय त्यात १४ ते १५ हजार लिटर ज्यूस निर्मितीची क्षमता आहे.◼️ उसाच्या जवळपास बरोबरीने इथेनॉल निर्मितीचे गुण गोड ज्वारीमध्ये आढळून येतात.◼️ त्यामुळे भविष्यात इथेनॉल निर्मितीच्या क्षेत्रात क्रांती संभवते.◼️ फुले वसुंधरा या गोड ज्वारीची वाढ तब्बल १६ फुटांपेक्षा (५.२ मीटर) अधिक होते.◼️ उसापेक्षाही ही ज्वारी उंचीला अधिक आहे.
फुले वसुंधरा या गोड ज्वारीमध्ये इथेनॉल निर्मितीची अफाट क्षमता दडलेली आहे. पश्चिम महाराष्ट्रात वारंवार उसाची पिके घेऊन जमिनीचा पोत खालावतो. अशा वेळी गोड ज्वारी उत्तम पर्याय ठरेल. साखर कारखान्यांशी आपण यासाठी संपर्क साधला आहे. - डॉ. उदयकुमार दळवी, सहायक प्राध्यापक, ज्वारी संशोधन प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी
अधिक वाचा: कर्जमाफीसाठी पुढील हलचाली सुरु; राज्य शासनाने बँकांकडून शेतकऱ्यांची 'ही' माहिती मागविली
Web Summary : Mahatma Phule Agricultural University's 'Phule Vasundhara' sorghum variety promises an ethanol revolution. With high sugar and juice content, it yields 70-80 tons per hectare in four months, rivaling sugarcane. This could transform ethanol production, offering a sustainable alternative for farmers.
Web Summary : महात्मा फुले कृषि विश्वविद्यालय की 'फुले वसुंधरा' ज्वार इथेनॉल क्रांति का वादा करती है। उच्च चीनी और रस सामग्री के साथ, यह चार महीनों में 70-80 टन प्रति हेक्टेयर उपज देती है, जो गन्ने को टक्कर देती है। यह किसानों के लिए एक स्थायी विकल्प प्रदान कर सकता है।