Join us

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात रविवारी रबी पीक परिसंवाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2023 14:34 IST

परिसंवादात रबी पिक लागवड, पिकांवरील कीड रोग व्‍यवस्‍थापन आदीं विषयावर विद्यापीठ शास्‍त्रज्ञ मार्गदर्शन करणार आहे.

मराठवाडा मुक्‍ती संग्राम दिनाच्‍या अमृत महोत्‍सवी वर्षानिमित्‍त वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील विस्‍तार शिक्षण संचालनालय व कृषि विभाग (महाराष्‍ट्र शासन) यांचे संयुक्‍त विद्यमाने रबी पीक परिसंवादाचे आयोजन दिनांक १७ सप्‍टेंबर रोजी सकाळी ११.०० वाजता कृषी महाविद्यालयाच्‍या सभागृहात करण्‍यात आले आहे.

उदघाटन कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि हे राहणार असून प्रमुख अतिथी म्‍हणुन अकोला येथील डॉ पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ शरद गडाख आणि नागपुर येथील महाराष्‍ट्र पशु आणि मत्‍स्‍य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ. नितिन पाटील हे उपस्थित राहणार आहेत. संचालक (शिक्षण) डॉ उदय खोडके, संचालक (संशोधन) डॉ दत्‍तप्रसाद वासकर, संचालक (बियाणे व लागवड सामुग्री) डॉ देवराव देवसरकर आदींची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

परिसंवादात रबी पिक लागवड, पिकांवरील कीड रोग व्‍यवस्‍थापन आदीं विषयावर विद्यापीठ शास्‍त्रज्ञ मार्गदर्शन करणार आहे. सदर परिसंवादास जास्‍तीत जास्‍त शेतकरी बांधवांनी उपस्थित राहण्‍याचे आवाहन विस्‍तार शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले आणि परभणीचे जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री दौलत चव्‍हाण यांनी केले आहे.

टॅग्स :रब्बीशेती क्षेत्रपीक व्यवस्थापन