Join us

Rabbi season : यंदाच्या हंगामात ज्वारीचे क्षेत्र घेतले गव्हाने! वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 18:00 IST

Rabi season : यंदाच्या पावसाळ्यात अधिक पाऊस झाल्याने जिल्ह्यात रब्बीचे क्षेत्र वाढले आहे. पाण्याच्या उपलब्धतेमुळे जिल्ह्यात मागील वर्षीच्या तुलनेत गव्हाचे क्षेत्र वाढले आहे. तर हरभऱ्याबरोबर सूर्यफुलाचे क्षेत्रही वाढले

लातूर : यंदाच्या पावसाळ्यात अधिक पाऊस झाल्याने जिल्ह्यात रब्बीचे (Rabbi) क्षेत्र वाढले आहे. पाण्याच्या उपलब्धतेमुळे जिल्ह्यात मागील वर्षीच्या तुलनेत गव्हाचे क्षेत्र वाढले असून, ज्वारीचे जवळपास ३ हजार हेक्टरने घटले आहे. गळीत धान्याचा पेरा जवळपास स्थिर राहिला आहे.

यंदा वरुणराजाने दमदार बरसात केल्याने बळीराजास दिलासा मिळाला. खरिपातील नुकसान थोडेफार भरून काढण्यासाठी पेरणीस सुरुवात केली.

अति पावसामुळे काही ठिकाणच्या जमिनीस वापसा न आल्याने पेरण्यासाठी शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागली. त्यामुळे डिसेंबरच्या मध्यावधीपर्यंत रब्बीची पेरणी सुरू होती.

जिल्ह्यात रब्बीचा ३ लाख ७९ हजार ६५ हेक्टरवर पेरा झाला आहे. त्याची १३५ अशी टक्केवारी आहे. सर्वाधिक पेरा रब्बीतील नगदी पीक हरभऱ्याचा झाला आहे. सध्या हरभरा बहरला आहे.

यंदा ज्वारीची पेरणी कमी

जिल्ह्यात गव्हाचा ८३ टक्के पेरा झाला आहे. त्यापेक्षाही ज्वारीचे क्षेत्र अधिक असले तरी गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा ज्वारीची पेरणी कमी झाली आहे.

३ लाख १२ हजार हेक्टरवर हरभरा...

पीकपेरणी (हे.)
ज्वारी३७,१६३
गहू१३,३८७
हरभरा३,१२,२७०
जवस११७
सूर्यफूल१०३
करडई१२,३५९

१३ हजार हेक्टरवर गव्हाचे पीक...

पीकवर्षपेरणी
गहू२०२२-२३१३,१२०
 २०२३-२४१०,५७९
 २०२४-२५१३,३८७
ज्वारी२०२२-२३३१,५५०
 २०२३-२४४०,१६०
 २०२४-२५३७,१६३

२० हजार हेक्टरने वाढले हरभरा पिकाचे क्षेत्र...

• गतवर्षीच्या तुलनेत यंदा हरभरा पिकाचे क्षेत्र जवळपास २० हजार हेक्टरने वाढले आहे. तसेच सूर्यफुलाच्या क्षेत्रातही गेल्यावर्षीपेक्षा यंदा दुपटीने वाढ झाली आहे, असे कृषी विकास अधिकारी दीपक सुपेकर म्हणाले.

• सध्या हरभरा, गहू, ज्वारी ही पिके बहरात आहेत. त्यामुळे चांगले उत्पादन मिळेल, अशी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आशा आहे.

ज्वारीच्या क्षेत्रात तीन हजार हेक्टरची घट

गहू८४%
ज्वारी११२%
हरभरा१४२ %

पाण्याची उपलब्धता......

गव्हास अधिक पाणी लागते. पाणीही उपलब्ध असल्याने आणि दरही चांगला असल्यामुळे शेतकऱ्यांनी गव्हाकडे लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा पेरा वाढला आहे. - रमेश जाधव, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, लातूर

हे ही वाचा सविस्तर : Jamin Mojani : जमीन मोजणी आता होणार सॅटेलाईटव्दारे! वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रगहूसुर्यफुलरब्बीरब्बी हंगामपीकपाणीलातूर