Lokmat Agro >शेतशिवार > QR code : शेतकऱ्यांनो! क्यूआर कोड स्कॅन करा; झटपट मिळवा कागदपत्रे वाचा सविस्तर

QR code : शेतकऱ्यांनो! क्यूआर कोड स्कॅन करा; झटपट मिळवा कागदपत्रे वाचा सविस्तर

QR code: Farmers! Scan the QR code; Get documents instantly and read in detail | QR code : शेतकऱ्यांनो! क्यूआर कोड स्कॅन करा; झटपट मिळवा कागदपत्रे वाचा सविस्तर

QR code : शेतकऱ्यांनो! क्यूआर कोड स्कॅन करा; झटपट मिळवा कागदपत्रे वाचा सविस्तर

QR code : बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयाने सर्व शेतकऱ्यांसाठी उपयोगी अशी ई-प्रणाली सुरु केली आहे. त्या विषयी वाचूया सविस्तर माहिती.

QR code : बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयाने सर्व शेतकऱ्यांसाठी उपयोगी अशी ई-प्रणाली सुरु केली आहे. त्या विषयी वाचूया सविस्तर माहिती.

शेअर :

Join us
Join usNext

बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयाने सर्व शेतकऱ्यांसाठी उपयोगी अशी ई-प्रणाली सुरु केली आहे. या प्रणालीमुळे आता शेतकऱ्यांना सरकारी कार्यालयात जाण्याची आवश्यकता नाही. घर बसल्या या सुविधेचा लाभ मिळवता येतो.

जिल्हाधिकारी कार्यालय, बुलढाणामार्फत जिल्ह्यातील सर्व शेतकरी व नागरिकांना ई-महसूल प्रणाली (e-mahsool system) अंतर्गत ऑनलाइन सेवांच्या विविध ई-प्रणालीचे एकत्रित क्यूआर कोड (QR code) उपलब्ध करून दिले आहेत.

हे क्यूआर कोड शेतकरी, नागरिकांनी मोबाइल फोनद्वारे स्कॅन करून लिंकवर क्लिक करावे आणि ई-महसूल प्रणाली अंतर्गत सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

या ई-महसूल प्रणालीमधील ई-हक्क, ई-चावडी नागरिक पोर्टल, ई- रेकॉर्डस्, ई-नकाशा, भूलेख, ई-फेरफार या ऑनलाइन सेवा नागरिकांसाठी उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

ई- हक्क प्रणालीद्वारे सातबाऱ्यावरील ई-करार नोंद, बोजा कमी करणे, बोजा नोंद घेणे, गहाणखत, मयत कुळ वारस, नाव कमी करणे, ७/१२ दुरुस्तीची नोंद करण्यासाठी ऑनलाइन अर्ज करता येतो.

ई-चावडी पोर्टलद्वारे जमीन महसूल कर पावती पाहता येते. ई-रेकॉर्डस् प्रणालीद्वारे जुना सातबारा, फेरफार, पेरेपत्रक पाहता येतात. ई- नकाशा प्रणालीद्वारे शेतजमिनीचा नकाशा पाहता येतो.

भूलेख प्रणालीद्वारे ऑनलाइन सातबारा उतारा, मालमत्ता पत्रक, ८ अ उतारा पाहता येतो. आपली चावडी डिजिटल नोटीस बोर्डच्या क्यूआर कोडद्वारे फेरफार नोटीस, मोजणी नोटीस पाहता येते.

ई-महसूल प्रणाली सुविधा उपलब्ध

जिल्ह्यातील सर्व शेतकरी, नागरिकांसाठी या डिजिटल ई- महसूल प्रणाली सुविधा जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत सर्व तलाठी कार्यालय, मंडळ अधिकारी कार्यालय, सर्व तहसील कार्यालय, सर्व उपविभागीय अधिकारी कार्यालयांत उपलब्ध करण्यात आल्या आहेत. या ई-प्रणाली सुविधेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

या सुविधेसाठी आहे क्युआर कोड

ई- हक्क प्रणाली, ई- रेकॉर्ड्स प्रणाली, शासन निर्णय GR, भूलेख प्रणाली, डिजीटल ८ अ उतारा, आपली चावडी, ई- नकाशा, ई- चावडी नागरिक पोर्टल अश्या ८ सुविधा जिल्हाधिकारी कार्यालयाने शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिल्या आहेत.

हे ही वाचा सविस्तर : Jamin Mojani : जमीन मोजणी आता होणार सॅटेलाईटव्दारे! वाचा सविस्तर

Web Title: QR code: Farmers! Scan the QR code; Get documents instantly and read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.