Pune : महा फार्मर प्रोड्यूस कंपनीने पुण्यातील मार्केड यार्ड येते तांदूळ महोत्सवाचे आयोजन केले असून त्यामुळे पुणेकरांना थेट शेतकऱ्यांकडून तांदूळ खरेदी करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामध्ये राज्यातील तांदूळ उत्पादन करणाऱ्या शेतकरी उत्पादक कंपन्या सहभागी झाल्या आहेत.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी महाएफपीसीच्या वतीने हा तांदूळ महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील, उत्तर महाराष्ट्र भागातील शेतकरी उत्पादक कंपन्यांनी आपापले उत्पादने विक्रीसाठी ठेवले आहेत.
तांदळाचे कोणते वाण?या महोत्सवामध्ये इंद्रायणी, आंबेमोहोर, रायभोग, इंद्रायणी ब्राऊन, जिरेसाळ, भंडारदरा परिसरातील प्रसिद्ध चिनोर, पार्वतीसूत, केशर, बासमती अशा वेगवेगळ्या जातीचे तांदूळ खरेदीसाठी उपलब्ध आहे.
प्रमुख आकर्षणतांदळाच्या विविध वाणांबरोबर येथे महिला स्वयंसहाय्यता गटांकडून तयार करण्यात आलेले प्रक्रियायुक्त पदार्थ विक्रीसाठी ठेवण्यात आलेले आहेत. यामध्ये लाकडी घाण्याचे तेल, पापड, शेवया, करवंदाचा ज्यूस, मिलेट्स पदार्थ आणि काळ्या रंगाचा तांदूळ विक्रीसाठी ठेवण्यात आलेला आहे.
किती दिवस असणार महोत्सव?येणाऱ्या १३ फेब्रुवारीपर्यंत हा तांदूळ महोत्सव असून या काळात पुणेकरांना थेट किरकोळ खरेदी करता येणार आहे.