Join us
Daily Top 2Weekly Top 5

Pune Agri Hackathon : ‘ॲग्री हॅकॅथान २०२६’ चा आराखडा तयार करण्याच्या जिल्हाधिकाऱ्याच्या सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 19:20 IST

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित ‘ॲग्री हॅकॅथान-२०२६’ आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक योगेश पाटील कृषी महाविद्यालयाचे महानंद माने, कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ यांच्यासह विविध संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Pune : ‘ॲग्री हॅकॅथान’ च्या माध्यमातून देशातील सर्वोत्तम, गुणवत्तापूर्ण कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यत पोहचवून त्यांच्या उत्पादनात वाढ करणे हा मुख्य उद्देश असून ‘ॲग्री हॅकॅथान-२०२६’ च्या आयोजनाच्या अनुषंगाने सर्वसमोवशक सुक्ष्मनियोजन आराखडा तयार करा, अशी सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित ‘ॲग्री हॅकॅथान-२०२६’ आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक योगेश पाटील कृषी महाविद्यालयाचे महानंद माने, कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ यांच्यासह विविध संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

‘ॲग्री हॅकॅथान २०२६’ च्या आयोजन १५ ते १६ मे २०२६ या कालवधीत करण्याचे नियोजन करावे, याकरिता कृषी क्षेत्राशी निगडित अधिकाधिक स्टार्टअप, नवोकल्पना, कौशल्याधिष्ठित विकास संस्था, तंत्रज्ञानाचा समावेश होईल, यादृष्टीने नियोजन करावे. या उपक्रमाची कृषी क्षेत्राशी निगडित संस्था, माध्यमे, समाज माध्यमे आदींच्या माध्यमातून व्यापक स्वरुपात प्रचार-प्रसिद्धी करण्यात यावी. सहभागी होणाऱ्या स्टॉलधारकांना सुस्थितीत सोई-सुविधा उपलब्ध होईल, याबाबत दक्षता घ्यावी. ॲग्री हॅकेथॉन संकेतस्थळ अद्यायवत करावे. यशस्वी व परिणामकारकरित्या आयोजन करण्याकरिता आयमॅट, बॉम्बे चेंबर ऑफ कॉमर्स, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, नाबार्ड, सिडबी, कृषी विज्ञान केंद्र आदी संस्थांची मदत घेवून त्यांच्या सूचना विचारात घ्यावात असे जिल्हाधिकारी म्हणाले.

‘ॲग्री हॅकॅथान २०२५’ ची फलश्रुती, यशस्वी उत्पादनांबाबत अधिकाधिक यशकथा करुन शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकऱ्यांपर्यंत पोहचवाव्यात. शेतकऱ्यांना थेट लाभ देण्याच्यादृष्टीने शासकीय अनुदानाचा योजनेत समावेश करण्याची कार्यवाही करावी. त्यापूर्वी सर्व उत्पादने प्रमाणित करण्याकरिता विद्यापीठ किंवा भारतीय कृषी संशोधन संस्थेकडून तपासून घ्यावीत, असेही डुडी म्हणाले.

कृषी विषयाशी निगिडीत योजनांचा घेतला आढावा

यावेळी बैठकीत प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना, राष्ट्रीय कृषी विकास योजना अंतर्गत कोरडवाहू क्षेत्र विकास 2025-26, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान-पौष्टिक तृणधान्य अंतर्गत जिल्हा कृषी महोत्सव २०२५, एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान शीतवाहन प्रस्ताव, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना, प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत शेतकरी सहभाग व नुकसानभरपाई, विमा संरक्षित क्षेत्र तपासणी अहवाल, विमा कंपनीकडे प्रलंबित अहवाल, महावेध प्रकल्प, स्वयंचलित हवामान केंद्राबाबत आढावा घेवून कार्यवाही करण्याच्या सूचना डुडी यांनी दिल्या.

English
हिंदी सारांश
Web Title : Pune Prepares for Agri Hackathon 2026: District Collector's Instructions

Web Summary : Pune is gearing up for Agri Hackathon 2026, aiming to boost farmer productivity with advanced agricultural technology. District Collector Jitendra Dudi emphasized comprehensive planning, involving startups, institutions, and widespread promotion. He also reviewed agricultural schemes, focusing on farmer benefits and product certification.
टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीपुणे