Join us

Protecting Crops : पक्षी, प्राण्यांपासून पिकांच्या संरक्षणासाठी काय आहे नवा फंडा जाणून घ्या सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 16:52 IST

Protecting Crops : पुर्वी वन्यप्राणी आणि पक्ष्यांना हुसकावण्यासाठी शेतकरी शेतामध्ये मळ्यावर बसून गोफण फिरवीत असत, तसेच शेतात बुजगावणे लावले जात होते. आता शेतकऱ्यांने नवा फंडा वापरला आहे. जाणून घ्या काय फंडा ते सविस्तर (Protecting Crops)

धम्मपाल डावरे

पूर्वी वन्यप्राणी आणि पक्ष्यांना हुसकावण्यासाठी शेतकरी शेतामध्ये मळ्यावर बसून गोफण फिरवीत असत, तसेच शेतात बुजगावणे लावले जात होते. शेतातील पिकांचे (Protecting Crops) वन्यप्राणी अतोनात नुकसान करतात. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते.

या बुजगावण्यांना पाहून वन्यप्राणी आणि पक्षी शेतात येण्याचे टाळत. यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान टळत होते; परंतु आता मात्र गोफण, मळा, बुजगावणे नावालाच राहिले असून, शेतकरी मळे करत नाहीत. (Protecting Crops)

हा आहे नवा फंडा

रात्री वन्यप्राणी शेतात येऊ नये म्हणून छोटा लाऊड स्पीकर शेतात रात्रभर लावून ठेवला जातो. यामुळे वन्यप्राणीदेखील पिकांमध्ये येत नाहीत. शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी शेतात थांबण्याची गरज भासत नाही. दिवसाही पक्ष्यांना शेतातून हाकलण्यासाठी स्पीकरचा वापर होतो. (Protecting Crops) पूर्वीच्या काळी वन्यप्राणी आणि पक्ष्यांपासून शेतातील पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतात दिवस-रात्र थांबावे लागत होते. शेतकऱ्यांना आपल्या शेतातील इतर कामे करता येत नव्हती; परंतु आता शेतात स्पीकर लावून पक्षी, प्राणी हाकलले जात असल्याने शेतकऱ्यांचा वेळेतही बचत होत आहे आणि पिकांचे संरक्षण होत आहे. (Protecting Crops)

स्पीकरमध्ये विविध आवाज

* १० प्रकारचे विविध आवाज स्पीकरमध्ये इनबिल्ट आहे. या लाऊड स्पीकरमध्ये कुत्र्यांचे, माणसांचे आवाज, प्राण्यांना हाकलण्यासाठीचे इतरही दहा, बारा प्रकारचे आवाज रेकॉर्ड केलेले आहेत.

* स्पीकरमधील रेकॉर्डिंग रात्रभर शेतात लावून ठेवले जाते. शेतातील पिकांचे संरक्षण करण्यासाठी स्पीकर लावला जातो. १०० ते ५०० रुपयांपर्यंत खर्च करुन शेतकरी निश्चिंत होत आहेत.

शेतात वन्यप्राणी तसेच पक्षी येऊ नयेत म्हणून स्पीकर लावतो. या स्पीकरमध्ये विविध आवाज रेकॉर्ड केलेले आहेत. वन्यप्राणी, पक्ष्यांना हाकलण्यासाठी याचा थोड्या प्रमाणात का होईना फायदा होत असल्याने शेतकरी पसंती देतात. - नवनाथ खाटवकर, शेतकरी

हे ही वाचा सविस्तर : Bhuimug Crop Management : भुईमूग पिकावरील खोडकुज, मुळकुज रोगाचे असे करा व्यवस्थापन

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेतीपीकपीक व्यवस्थापन