किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत रब्बी हंगाम २०२४-२५ मधील ज्वारी, मका व बाजरी या भरडधान्यांची खरेदी ३० जूनपर्यंत करण्यात आली. त्यात जळगाव जिल्ह्यातील १८ केंद्रांवर १० हजार २९ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली असताना ६३ हजार ८६ क्विंटल ज्वारीची खरेदी करण्यात आली.
या खरेदीपोटी २१ कोटी २६ लाख ६२ हजार ९०६ मोबदला देण्याची प्रक्रिया सुरु आहे. जळगाव जिल्ह्यात किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत रब्बी हंगामातील ज्वारी, मका व बाजरी या भरडधान्यांची खरेदी करण्यात आली आहे.
अशी आहे शेतकऱ्यांची नोंदणी
अमळनेर ८८२, पारोळा १६५६, चोपडा २८६, एरंडोल ९५४, धरणगाव ६५६, पाळधी २३६, म्हसावद १९२, जळगाव ३५६, भुसावळ २७, यावल २३, रावेर ६३, मुक्ताईनगर ७६९, बोदवड ४५७, जामनेर ६३१, शेंदुर्णी २८८, पाचोरा ८६३, भडगाव ११४९ व चाळीसगाव ४७१ शेतकऱ्यांनी कडधान्य खरेदीसाठी नोंदणी केली आहे.
जिल्ह्यातील केंद्रनिहाय झालेली खरेदी
केंद्र | खरेदी (क्विंटल) | केंद्र | खरेदी क्विंटल |
अमळनेर | १४८ | यावल | २४ |
पारोळा | ११३ | रावेर | ६४ |
चोपडा | ०९ | मुक्ताईनगर | २१४ |
एरंडोल | १७२ | बोदवड | २० |
धरणगाव | ५९ | जामनेर | ९४ |
पाळधी | ४३ | शेंदूर्णी | १०८ |
म्हसावद | ७५ | पाचोरा | १५२ |
जळगाव | १०२ | भडगाव | १४५ |
भुसावळ | ८६ | चाळीसगाव | १३४ |
मुदतवाढ मिळण्याची शक्यता
ज्वारी ३ हजार ३७१, मका २ हजार २२५, तर बाजरी २ हजार ६२५ रुपये प्रतिक्विंटल दराने खरेदी करण्यात आली आहे. हमीभाव खरेदी अंतर्गत भरडधान्य खरेदीसाठी उर्वरित नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांसाठी मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे, अशी माहिती प्रभारी जिल्हा पणन अधिकारी सुनील मेने यांनी दिली.