PMMVY : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १ जानेवारी २०१७ रोजी प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना सुरू केली. प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना (PMMVY) अंतर्गत गरोदर महिला आणि स्तनदा मातांना ५ हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.
प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना (PMMVY) ही केंद्र सरकारची योजना आहे. जी महिला आणि बाल विकास मंत्रालय व समाज कल्याण विभागामार्फत राबवली जाते.
महिलांना हफ्त्यांमध्ये मदत दिली जाते. जर पात्र महिला जननी सुरक्षा योजनेंतर्गत लाभार्थी असेल, तर तिला अतिरिक्त १ हजार रुपये म्हणजेच एकूण ६ हजार रुपये दिले जातात. जवळच्या अंगणवाडी केंद्र किंवा आरोग्य केंद्राला भेट देऊन या योजनेचा लाभ घेऊ शकता. लाभार्थीला ही रक्कम थेट त्याच्या बँक खात्यात टाकली जाते.
योजनेअंतर्गत लाभार्थी महिलेला ५ हजार रुपये दिले जातात, जे हप्त्यानुसार तिला प्रदान केले जातात. जननी सुरक्षा योजनेअंतर्गत पात्र महिलेला १ हजार रुपये अतिरिक्त रक्कम म्हणजेच एकूण ६ हजार रुपये पात्र महिलेला दिले जातात.
अशी मिळते रक्कम
* पहिला हप्ता : अंगणवाडी केंद्रात किंवा आरोग्य सुविधेवर गर्भधारणेची नोंदणी करण्यासाठी १ हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.
* दुसरा हप्ता : गर्भधारणेच्या सहा महिन्यांनंतर, २ हजार रुपयांचा दुसरा हप्ता दिला जातो.
* तिसरा हप्ता : २ हजार रुपयांचा तिसरा हप्ता मुलाच्या जन्माची नोंदणी आणि लसीकरणाच्या वेळी दिला जातो.
असा करा अर्ज
* या योजनेत अर्ज करण्यासाठी तुम्हाला फॉर्म डाऊनलोड करावा लागतो.
* तुम्ही महिला आणि बाल विकास विभागाच्या अधिकृत वेबसाइट https://pmmvy.wcd.gov.in/ वर जाऊन
अथवा आपल्या जवळच्या अंगणवाडी केंद्र किंवा आरोग्य सुविधा केंद्राला भेट देऊन फॉर्म भरता येऊ शकतो.
या आहेत अटी
* या योजनेसाठी लागणारी पात्रता अर्जदार भारताचा कायमचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
* या योजनेचा लाभ लाभार्थ्याला एकदाच मिळू शकतो. गर्भपात / मृत जन्माच्या बाबतीत, लाभार्थी त्याच्या उर्वरित हप्त्यांसाठी पात्र असेल.
* राज्य सरकार किंवा केंद्र सरकारमध्ये नियमितपणे काम करणारी व्यक्ती या योजनेसाठी अपात्र असेल.
* प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना (PMMVY) अंतर्गत गर्भवती आणि स्तनदा महिला अर्ज करू शकतात.
* या योजनेत गरोदर व स्तनदा अंगणवाडी सेविका महिला अर्ज करू शकतात.
* लाभार्थीचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक केलेले असावे.
* लाभार्थी आणि त्याच्या पतीचा आधार कार्ड क्रमांक देणे अनिवार्य असेल.
काय लागतील कागदपत्रे
* लाभार्थी महिलेने स्वतः ची आणि तिच्या पतीची रीतसर स्वाक्षरी केलेले हमीपत्र/ संमती पत्र द्यावे लागेल.
* मोबाईल नंबर - मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक केलेला असावा.
* बँक खाते तपशील
* MCP कार्ड (माता-बाल संरक्षण कार्ड)
* लाभार्थी आणि तिचा पती यांच्या ओळखीचा पुरावा (आधार कार्ड किंवा दोघांचे ओळखपत्र)
* दुसऱ्या हप्त्याचा दावा करण्यासाठी, गर्भधारणेच्या ६ महिन्यांनंतर किमान एक प्रसूतीपूर्व तपासणी दर्शविणारी MCP कार्डची छायाप्रत
* तिसऱ्या हप्त्याचा दावा करण्यासाठी, लाभार्थीकडून मुलाच्या जन्म नोंदणीची एक प्रत आणि मुलाने लसीकरणाची पहिली फेरी पूर्ण केली असल्याचे दर्शवणारे MCP कार्ड.
* अर्ज करण्याची प्रक्रिया घ्या जाणून जर तुम्ही प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना २०२४ (PMMVY) च्या सर्व अटी पूर्तता केल्यास तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता.
अर्ज करण्याची प्रक्रिया अशी :
* सर्वप्रथम या योजनेचा अर्ज प्राप्त करावा.
* हा फॉर्म तुम्ही अंगणवाडी केंद्रातून किंवा आरोग्य सुविधेतून मिळवू शकता.
किंवा https://pmmvy.wcd.gov.in/ या महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन फॉर्म डाउनलोड करू शकता.
* फॉर्मवर संपूर्ण माहिती भरल्यानंतर तुमची कागदपत्रे जोडावी लागतील आणि ती अंगणवाडी केंद्र किंवा आरोग्य सुविधा केंद्रात जमा करावी लागतील.
अंगणवाडी केंद्र किंवा आरोग्य सुविधाद्वारे तुम्हाला एक पोचपावती दिली जाईल जी तुम्हाला भविष्यासाठी तुमच्याकडे ठेवावी लागेल.
रक्कम मिळाली की नाही ते असे तपासा
* प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेंतर्गत दिलेली आर्थिक रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात डीबीटीद्वारे हस्तांतरित केली जाते.
तुम्ही खालील स्टेपस फॉलो करा
* सर्वप्रथम तुम्हाला या योजनेच्या अधिकृत वेबसाइट https://pmmvy.wcd.gov.in/ ला भेट द्यावी लागेल .
* तुमच्या समोर लॉगिन फॉर्म उघडा.
* तुमचा ई-मेल आयडी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करा.
* लॉग इन केल्यानंतर, पुढील पृष्ठावर तुम्हाला लाभार्थीची स्थिती जाणून घेण्याचा पर्याय मिळेल.
* तुम्हाला लाभार्थीचा आधार क्रमांक टाकावा लागेल आणि सर्च वर क्लिक करावे लागेल.
* क्लिक केल्यानंतर पेमेंट स्टेटस तुमच्या समोर येईल आणि तुम्हाला मिळालेल्या हप्त्याची संपूर्ण माहिती मिळेल.
* तुम्ही तुमचा पेमेंट रिपोर्ट तपासून तो डाऊनलोड करण्याची सुविधा उपलब्ध आहे.