केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान योजनेचा लाभ शेतकरी घेत आहेत. पीएम किसान योजनेत वर्षाला ६ हजार रुपये दिले जातात. तीन हप्त्यांमध्ये हे पैसे दिले जातात.
या योजनेत शेतकऱ्यांना २० वा हप्ता नुकताच वितरित केला असून शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले आहेत. ई-केवायसी न केल्यामुळे बरेच शेतकरी पीएम किसान योजनेच्या लाभापासून वंचित राहिले आहेत.
केंद्र शासनाकडून २० हप्त्यांचा लाभ पात्र लाभार्थ्यांना वितरित केला आहे. हा लाभ नियमित मिळण्यासाठी दरवर्षी केवायसी करणे बंधनकारक असते.
मात्र, शासनस्तरावरून वेळोवेळी आदेश देऊनही शेतकऱ्यांनी ई-केवायसी पूर्ण केली नाही. यामुळे त्यांना पीएम किसान योजनेपासून वंचित राहावे लागले.
काय आहे योजना?ही शेतकऱ्यांसाठी केंद्र शासनाने बनविलेली योजना आहे. या योजनेंतर्गत २ हेक्टरपर्यंत जमीन असलेल्या शेतकऱ्यांना प्रतिवर्षी ६ हजार रुपये अनुदान दिले जाते.
हप्ता न मिळण्याची कारणे?◼️ जमिनीच्या नोंदीतील त्रुटी : कागदपत्रे अपूर्ण किंवा चुकीच्या नोंदी.◼️ आधार लिंकिंग नाही : बँक खाते आधारशी जोडलेले नसणे.◼️ पात्रता निकष पूर्ण नाही : सरकारी नोकरी, २ हेक्टरपेक्षा जास्त जमीन तांत्रिक अडचणी : पोर्टलमधील त्रुटी.
ई-केवायसी कुठे करायची?◼️ ऑनलाइन : pmkisan.gov.in वर 'ई-केवायसी' पर्याय निवडा, आधार क्रमांक टाका, ओटीपीद्वारे पडताळणी करा.◼️ ऑफलाइन : जवळच्या नागरी सुविधा केंद्रामध्ये बायोमेट्रिक ई-केवायसी करा.◼️ मोबाइल ॲप : पीएम किसान ॲपद्वारे ई-केवायसी पूर्ण करा.◼️ हेल्पलाइन : अडचणींसाठी संपर्क साधा.
अधिक वाचा: शेतकऱ्यांना आता कमी व्याजात पीककर्ज मिळणार; नाबार्ड द्विस्तरीय रचना आणणार