Join us

Pik Vima Yojana: काय सांगताय! शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची तुटपुंजी रक्कम; काय आहे प्रकरण वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2025 12:00 IST

Pik Vima Yojana : मागील काही दिवसांपासून प्रधानमंत्री पीक विमा योजना (Pik Vima Yojana) विविध कारणामुळे चर्चात आली आहे. तसाच एक अजब प्रकार नुकताच परभणी जिल्ह्यात समोर आला आहे. वाचा प्रकरण सविस्तर (crop insurance)

Pik Vima Yojana : मागील काही दिवसांपासून प्रधानमंत्री पीक विमा योजना(Pik Vima Yojana) विविध कारणामुळे चर्चात आली आहे. तसाच एक अजब प्रकार नुकताच परभणी जिल्ह्यात समोर आला आहे.(crop insurance)

प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत(Pik Vima Yojana) परभणी जिल्ह्यात २०२४-२५ खरीप हंगामासाठी तब्बल ४०२ कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले आहे. परंतु प्रत्यक्षात बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यात तुटपंजी रक्कम जमा करण्यात आली असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे.(crop insurance)

परभणी जिल्ह्यात प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत २०२४-२५ हंगामासाठी एकूण ४०२ कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले आहे.(crop insurance)

यामध्ये प्रतिकूल परिस्थितीअंतर्गत ६ लाख ७२ हजार ५५७ शेतकऱ्यांना २९९ कोटी रुपये, तर स्थानिक नैसर्गिक आपत्तीअंतर्गत ४८ हजार ८१७ शेतकऱ्यांना १०३ कोटी रुपयांचे नुकसानभरपाई वाटप करण्यात आली आहे.(crop insurance)

मात्र, प्रत्यक्षात बहुतांश शेतकऱ्यांना केवळ दोन ते तीन हजार रुपयांचीच रक्कम मिळाल्यामुळे या योजनेवर मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली जात आहे.

जिल्ह्यातील ७ लाख शेतकऱ्यांनी खरीप हंगामात सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद यासारख्या पिकांचा विमा भरला होता. मात्र, सप्टेंबर २०२४ मध्ये आलेल्या वादळी पावसामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले.

शेतकऱ्यांना तरीही विम्यातून खर्च भरपाई मिळेल, अशी अपेक्षा होती. परंतु विमा कंपनीने जाहीर केलेले २९९ कोटींचे अग्रीम मदतनिधीही तुकडे-तुकडे करून वाटप करण्यात आला. विशेष म्हणजे तक्रारी करूनही लाखो शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित ठेवले गेले आहे.(crop insurance)

४०२ कोटींचे वाटप कसे झाले?

* प्रतिकूल हवामानाखालील नुकसानभरपाई : ६.७२ लाख शेतकऱ्यांना २९९ कोटी रुपये वाटप

* स्थानिक नैसर्गिक आपत्तीअंतर्गत : ४८,८१७ शेतकऱ्यांना १०३ कोटी रुपये भरपाई

४८ हजार ८१७ शेतकऱ्यांना मदत

स्थानिक आपत्ती अंतर्गत दाखल करण्यात आलेल्या ५ लाख ५६ हजार तक्रारीपैकी केवळ ४८ हजार ८१७ शेतकऱ्यांना १०३ कोटींची मदत वाटप केल्याचा अहवाल देण्यात आला.

इतके विसंगत वाटप कशाच्या आधारे?

* परभणी जिल्ह्यात प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत २०२४-२५ या खरीप हंगामात स्थानिक नैसर्गिक आपत्तीच्या अनुषंगाने ४८ हजार ८१७ शेतकऱ्यांना एकूण १०३ कोटी रुपयांचे वाटप करण्यात आल्याचा अहवाल कृषी विभागासमोर सादर करण्यात आला आहे.

* या अहवालानुसार जिंतूर तालुका वितरणात आघाडीवर असून, ९,१६५ शेतकऱ्यांना तब्बल २२ कोटी १५ लाख रुपयांचे वाटप करण्यात आले. त्यानंतर सेलू तालुक्यातील ७,२८३ शेतकऱ्यांना १८ कोटी ६० लाख, पालम तालुक्यात ४,८१९ शेतकऱ्यांना १४ कोटी २३ लाख, तर गंगाखेड तालुक्यातील ७,४१३ शेतकऱ्यांना ११ कोटी १७ लाख रुपये मदतीचा लाभ दिला.

* परभणी तालुक्यात ३,७५४ शेतकऱ्यांना ५ कोटी ९० लाख, पूर्णा ३,६६१ शेतकऱ्यांना मात्र ५ कोटी ९४ लाख, तर पाथरी तालुक्यात ४,२३९ शेतकऱ्यांना ८ कोटी ६५ लाख रुपयांचे वितरण करण्यात आले. मानवत तालुक्यातील ५,८०८ शेतकऱ्यांना १० कोटी आणि सोनपेठ तालुक्यात २,६५२ शेतकऱ्यांना ६ कोटी ६२ लाख रुपयांची भरपाई देण्यात आली आहे.

विमा कंपनीने दाखवलेली आकडेवारी आणि शेतकऱ्यांच्या हाती पडलेली रक्कम यामध्ये मोठी तफावत दिसून येत असल्याने ही योजना फक्त कागदावरच यशस्वी असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे ४०२ कोटी वाटले तरीही २ ते ३ हजार रुपये खात्यात वर्ग करण्यात आले.

तालुकानिहाय वाटपाचा आढावा (स्थानिक आपत्तीअंतर्गत)

तालुकालाभार्थी शेतकरीवाटप रक्कम (₹)
जिंतूर९,१६५२२.१५ कोटी
सेलू७,२८३१८.६० कोटी
पालम४,८१९१४.२३ कोटी
गंगाखेड७,४१३११.१७ कोटी
मानवत५,८०८१०.०२ कोटी
पाथरी४,२३९८.६५ कोटी
परभणी३,७५४५.९० कोटी
पूर्णा३,६६१५.९४ कोटी
सोनपेठ२,६५२६.६२ कोटी

हे ही वाचा सविस्तर :  Pik Vima: शासनाच्या एक रुपयात पीक विमा योजनेचे वास्तव जाणून घ्या सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रकृषी योजनाशेतकरीपीकपीक विमासरकारी योजना