Join us

Pik Vima Yojana : शेतकऱ्यांनो रब्बी पिक विमा अर्ज प्रक्रिया झाली सुरू ; ही आहे शेवटची तारिख वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2024 15:25 IST

खरीप प्रमाणेच रब्बी हंगामातही केवळ एक रुपयांत पीक विमा भरता येणार आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी काय आहे शेवटची तारिख ते वाचा सविस्तर (Pik Vima Yojana)

Pik Vima Yojana :

अकोला : खरीप प्रमाणेच रब्बी हंगामातही केवळ एक रुपयांत पीक विमा भरता येणार आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी १५ डिसेंबरची अंतिम मुदत देण्यात आली आहे.

रब्बी हंगामात गहू, हरभरा पिकांना विमा सरंक्षण मिळणार आहे. यामुळे शेतकऱ्यांनी मुदतीत विमा भरणे गरजेचे आहे. राज्य शासनाने जून २०२३ मध्ये सर्वसमावेशक पीक विमा योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

रब्बी हंगामातही प्रति अर्ज एक रुपयांत पीक विमा योजनेत शेतकऱ्यांना सहभागी होता येणार आहे. नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगामुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण मिळणार आहे.

कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिकतेप्रमाणे योजनेत सहभागी होता येईल. पीकविमा योजना अधिसूचित पिकांसाठी केवळ अधिसूचित क्षेत्रासाठी लागू राहणार आहे.

जिल्ह्यात रब्बी गहू बागायती, हरभरा, रब्बी कांदा ही पिके अधिसूचित करण्यात आली आहेत. मुदतीपूर्वी शेतकऱ्यांनी विमा योजनेत सहभागी व्हावे, यासाठी कृषी विभागाकडून गावस्तरावर जनजागृती केली जात आहे.

सामूहिक सेवा केंद्रावर भरता येईल अर्ज

पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांना सहजपणे अर्ज करता यावा, यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याचीदेखील सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. अर्ज संकेतस्थळावर स्वतः तसेच बँक, विमा कंपनी प्रतिनिधी व सामूहिक सेवा केंद्र यांच्यामार्फत अर्ज करता येतो.

मुदतीपूर्वी विमा भरावा

पिकांना विमा संरक्षण असल्यास नैसर्गिक आपत्तीत नुकसान झाल्यास भरपाई म्हणून विमा कंपनीकडे मोबदला मागता येतो. त्यासाठी रब्बी हंगामात पेरणी केलेल्या शेतकऱ्यांनी विमा योजनेत सहभागी होण्यासाठी मुदतीपूर्वी अर्ज करणे गरजेचे आहे. अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे यांनी दिली.

टॅग्स :शेती क्षेत्रपीक विमारब्बीशेतकरीशेती