Pik Vima : २०२४ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे खारपान पट्ट्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. सोयाबीन, मूग, कपाशी, तूर यांसारख्या पिकांचे नुकसान भरून काढण्यासाठी अनेक शेतकऱ्यांनी (Farmers) पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत वेळेवर क्लेम दाखल केला. (Pik Vima)
मात्र, सात महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर केवळ २,१०० रुपयांची भरपाई देऊन विमा कंपनीने शेतकऱ्यांची (Farmers) थट्टा केल्याचा आरोप होत आहे. भरपाई न मिळाल्यामुळे परिसरातील शेतकरी (Farmers) संतप्त झाले असून, तहसीलदार आणि जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे. (Pik Vima)
खारपान पट्ट्यातील चोहोट्टा बाजार व दहीहंडा मंडळांतर्गत येणाऱ्या केळीवेळी, धारेल, गिरजापूर, जऊळखेड, काटी, पाटी या गावांतील शेतकऱ्यांना (Farmers) २०२४ या साला मध्ये चार वेळा झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान सहन करावे लागले. (Pik Vima)
सोयाबीन, मूग, उडीद, कपाशी, तूर आदी पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांनी पंतप्रधान पिकविमा योजनेंतर्गत विमा काढून नियमाप्रमाणे ७२ तासांच्या आत कंपनीकडे क्लेमही दाखल केला; परंतु सात महिन्यांनंतर केवळ २,१०० इतकी नुकसानभरपाई देऊन संबंधित विमा कंपनीने शेतकऱ्यांची थट्टा केल्याचा आरोप स्थानिक शेतकऱ्यांनी केला आहे. (Pik Vima)
केळीवेळी परिसरातील शेती ग्रामदानात आल्यामुळे येथे मागील दोन वर्षापासून फक्त २५ टक्केच नुकसानभरपाई मिळते. मात्र, यावर्षी ती देखील अद्याप शेतकऱ्यांच्या (Farmers) खात्यावर जमा झालेली नाही. (Pik Vima)
विमा कंपनीकडून अपूर्ण भरपाई
सोयाबीन पेरणीसाठी एकरी किमान १०,००० खर्च येतो. त्यामध्ये बियाणे, खत, औषध, मशागत व इतर प्रक्रियेचा समावेश होतो; मात्र केवळ २१०० इतकी भरपाई देण्यात आल्याने शेतकरी वर्गात तीव्र नाराजी आहे.
काही ठिकाणी नुकसान भरपाईची रक्कम कमी देऊन कंपनीने शेतकऱ्यांची खिल्ली उडवल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. विशेष म्हणजे, अनेक शेतकऱ्यांनी वेळेवर क्लेम केला असूनही भरपाईपासून वंचित ठेवले गेले आहे, तर जे शेतकरी क्लेम करू शकले नाहीत, त्यांना एक रुपयाही भरपाई देण्यात आलेली नाही. त्यामुळे शेतकरी वर्गात तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.
काटी शिवारात सोयाबीन, मूग व उडीद पिकाचा विमा घेतला होता. सर्वेही झाला; परंतु भरपाई काही मिळालेली नाही. शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत मिळणे गरजेचे आहे. - अतुल चहाटे, शेतकरी, काटी
मी मूग व उडीद पिकांचा विमा काढला होता. क्लेमसुद्धा वेळेत केला. विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी फोटो काढून सर्वेक्षण केले, तरीही आजवर एक रुपयाही भरपाई मिळालेली नाही. - सुरज बुले, शेतकरी, केळीवेळी
गेल्यावर्षी अतिवृष्टीमुळे संपूर्ण पीक सडले. ट्रॅक्टरने जमीन परत तयार करावी लागली. एवढे नुकसान होऊनही आजतागायत एकही रुपया मिळालेला नाही. - उमेश कोलटक्के, शेतकरी, पाटी