Join us

SSC HSC Result पेपर चेक झाले; दहावी, बारावीचा निकाल कधी लागणार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2024 11:16 AM

राज्य शिक्षण मंडळाच्या सर्व विभागीय मंडळांनी इयत्ता दहावी आणि बारावी परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासणीचे काम जवळपास पूर्ण केले आहे.

पुणे : राज्य शिक्षण मंडळाच्या सर्व विभागीय मंडळांनी इयत्ता दहावी आणि बारावी परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासणीचे काम जवळपास पूर्ण केले आहे.

सध्या गुणपत्रिका तयारीचे काम सुरू असून, मे महिन्याच्या अखेरीस दहावी आणि बारावी दोन्ही वर्गाचा निकाल जाहीर करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, अशी माहिती राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली.

दहावी परीक्षेदरम्यान निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाली. त्यामुळे शिक्षकांना प्रशिक्षण आणि प्रत्यक्षात मतदान प्रक्रियेता ड्युटीही बजावावी लागली.

निवडणुकीमुळे उत्तरपत्रिकांची तपासणी पूर्ण करणे आव्हानात्मक होते. मात्र, निकाल वेळेत जाहीर व्हावा, यासाठी व्हीसीद्वारे बैठक घेत विभागीय मंडळाच्या अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. विभागीय मंडळातील अधिकारी आणि शिक्षकांनी वेळेत काम पूर्ण केले आहे. - शरद गोसावी, अध्यक्ष, राज्य मंडळ

टॅग्स :परीक्षादहावी12वी परीक्षादहावीचा निकालबारावी निकालविद्यार्थीमहाराष्ट्रनिवडणूक