Join us
Daily Top 2Weekly Top 5

पंचगंगा शुगर कारखान्याकडून पहिल्या पंधरवड्याचे ऊस बिल जमा; २६५ उसाला कसा दिला दर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2025 13:45 IST

panchganga sugar factory १ ते १५ नोव्हेंबरदरम्यान गळितास आलेल्या सर्व उसाचा मोबदला १ डिसेंबर रोजी थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आला.

नेवासा : महालगाव येथील पंचगंगा शुगर अँड पॉवर प्रा., लिमिटेड कारखान्याकडून ऊस बागायतदारांना दिलेला शब्द पाळत पहिल्या पंधरवड्याचे पेमेंट वेळेवर जमा केले.

१ ते १५ नोव्हेंबरदरम्यान गळितास आलेल्या सर्व उसाचा मोबदला १ डिसेंबर रोजी थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आला.

या कालावधीत २६५ ऊस जातीस प्रति मेट्रिक टन ३,०५० रुपये, तर इतर जातींसाठी ३,१५० रुपये दर निश्चित करण्यात आला होता. ठरलेल्या दरानुसार कोणतीही कपात न करता संपूर्ण रक्कम खात्यावर जमा करण्यात आली.

यंदाच्या हंगामात कारखान्याने 'पारदर्शक वजन काटा व पंधरा दिवसांत पेमेंट' ही प्रमुख तत्वे केंद्रस्थानी ठेवून कारभार सुरू केल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

पंचगंगा कारखान्याने शेतकऱ्यांना खासगी वजनकाट्यावर उसाचे वजन मोजण्याची मुभा दिलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा ओढा कारखान्याकडे वाढला आहे. इतर कारखान्यांनीही अशीच मुभा द्यावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

अधिक वाचा: सोलापूर जिल्ह्यातील १६ साखर कारखान्यांचा ऊस दर जाहीर? कुणी दिला किती दर? वाचा सविस्तर

English
हिंदी सारांश
Web Title : Panchganga Sugar Mill Deposits First Fortnight's Sugarcane Bill Promptly

Web Summary : Panchganga Sugar Mill promptly deposited the first fortnight's sugarcane bill into farmers' accounts. A rate of ₹3,050/ton was given for the 265 variety and ₹3,150/ton for other varieties. Farmers appreciate the transparent weighing system and timely payments, leading to increased sugarcane supply to the factory.
टॅग्स :साखर कारखानेऊसशेतकरीकाढणीशेतीनेवासाबँक