जळगाव : अमळनेर परिसरात यंदा रब्बी हंगामातील कोरडवाहू हरभरा पिकाचे विक्रमी उत्पादन झाल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे. अनेक शेतकऱ्यांनी यंदा कापसाचा पेरा कमी करून ते मका व हरभरा पिकांकडे वळले आहेत.
शेतकऱ्यांनी गव्हासाठी राखीव ठेवलेल्या शेतात ११० ते १२० रुपये प्रतिकिलो दराने हरभरा बियाणे खरेदी करून रबी कोरडवाहू हरभन्याची पेरणी केली. पेरणीच्या वेळी झालेला पाऊस, अनुकूल हवामान, थंडी आणि वेळेवर पडलेला ऊस यामुळे हरभरा पिकाची वाढ जोमदार झाली.
एका बिघ्याला १० क्विंटल उत्पादनएका बिध्यात सरासरी ९ ते १० क्विंटल उत्पादन मिळाले. दरवर्षी हेच उत्पादन साधारण ३ ते ४ क्विंटल इतके असते; मात्र यंदा निसर्गाच्या कृपेने दुप्पट-तिप्पट वाढ झाली आहे. खर्च कमी, उत्पादन जास्त आणि समाधानकारक बाजारभाव यामुळे बळीराजाला मोठा आर्थिक आधार मिळाला आहे.
असे आहेत मजुरीचे दरहरभरा कापणी व गोळा करणे : २१०० ते २२०० रुपये प्रति बिघे (३० गुंठे)मशीनद्वारे हरभरा काढणी व मार्केटपर्यंत वाहतूक : प्रतिक्विंटल ३५० रुपये
असा आहे बाजारभावहरभऱ्याला मार्केटमध्ये सरासरी ५००० ते ५१०० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. एकाच वेळी मोठ्या प्रमाणावर काढणी सुरू झाल्याने शेतकऱ्यांना काहीशी धावपळ करावी लागली.
रोजगारालाही चालनाहरभरा पिकामुळे मजूर वर्ग, काढणी यंत्र चालक, ट्रॅक्टर व पिकअप वाहन मालक, तसेच ड्रायव्हर यांना मोठ्या प्रमाणात काम उपलब्ध झाले. हरभरा कापणीसाठी मध्य प्रदेशातून आलेल्या आदिवासी पावरा समाजातील मजुरांनीही साथ दिली. त्यामुळे मजूर टंचाई तीव्रतेने जाणवली नाही.
मुऱ्हा, जाफराबादी, सुरती म्हशींचा लिलाव, लिलावात सहभागी होण्यासाठी इथे संपर्क साधा
Web Summary : Amalner farmers rejoice with record chickpea yields, earning ₹5000/quintal. Reduced cotton farming boosted production. Good weather and timely rain aided growth, doubling output and boosting local employment.
Web Summary : अमलनेर के किसानों को चने की रिकॉर्ड पैदावार से खुशी, ₹5000/क्विंटल की कमाई। कपास की खेती में कमी से उत्पादन बढ़ा। अच्छे मौसम और समय पर बारिश से वृद्धि हुई, उत्पादन दोगुना हुआ और स्थानीय रोजगार को बढ़ावा मिला।