Join us
Daily Top 2Weekly Top 5

आता दुपारची लाईट जाणे होणार बंद; महावितरणच्या मुख्यालयाकडून आले 'हे' नवे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2026 15:33 IST

power cut उन्हाळ्यात विजेच्या वाढत्या मागणीच्या कालावधीत आणि पावसाळी परिस्थितीत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणकडून वीज यंत्रणेशी संबंधित विविध देखभाल व दुरुस्तीची पूर्वनियोजित कामे सध्या सुरू आहेत.

उन्हाळ्यात विजेच्या वाढत्या मागणीच्या कालावधीत आणि पावसाळी परिस्थितीत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणकडूनवीज यंत्रणेशी संबंधित विविध देखभाल व दुरुस्तीची पूर्वनियोजित कामे सध्या सुरू आहेत.

मात्र, उन्हाच्या तडाख्यात नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी ही कामे सकाळी ७ ते ११ वाजेदरम्यान करावीत, असे निर्देश मुख्यालयाकडून क्षेत्रीय कार्यालयांना शनिवारी देण्यात आले आहेत.

पावसाळ्यात वीजयंत्रणा सज्ज ठेवण्यासाठी तसेच वीजपुरवठा खंडित होणे व वीजसुरक्षेचे धोके टाळण्यासाठी ग्राहकांना पूर्वसूचना देऊन देखभाल व दुरुस्तीची कामे राज्यभरात सुरू आहेत.

मे महिन्याच्या अखेरीस कामे पूर्ण होतात. मात्र, सद्यःस्थितीत सकाळी १० ते दुपारी २ किंवा ४ वाजेपर्यंत वीज पुरवठा बंद ठेवत देखभाल व दुरुस्तीची कामे सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर हे आदेश देण्यात आले आहेत.

ग्राहकांना एसएमएस करादेखभाल दुरुस्तीची पूर्वनियोजित कामे करताना प्राधान्याने पर्यायी वीजपुरवठा उपलब्ध करून देण्याचे तसेच वीज ग्राहकांना एसएमएसद्वारे कळविण्याचे निर्देश आहेत.

कोणती कामे सुरू आहेत?◼️ झाडांच्या छोट्या फांद्या तोडणे.◼️ तुटलेले पिन व डिस्क इन्सुलेटर्स बदलणे.◼️ वितरण रोहित्रे, फिडर पिलर, रिंगमेन युनिटचे अर्थिग तपासणे.◼️ ऑइल फिल्टरेशन व ऑइल टॉपिंग अप, रोहित्राच्या वितरण पेटीची दुरुस्ती, नादुरुस्त लाईटनिंग अरेस्टर बदलणे.◼️ वीजखांब व तारांचे मजबुतीकरण, तारांमधील झोल काढणे.◼️ गंजलेले किंवा खराब झालेले वीजखांब बदलणे.◼️ जुन्या वीजतारा बदलणे.◼️ फिडर पिलरची साफसफाई व आवश्यकतेनुसार इन्सुलेशन स्प्रे मारणे.◼️ उच्च व लघुदाब वीजतारांना गार्डिंग करणे.◼️ उपकेंद्रातील ब्रेकर्सची दुरुस्ती, बॅटरी चार्जिंग, पॉवर ट्रान्सफॉर्मरची देखभाल व ऑइल टॉपिंग अप.

अधिक वाचा: घातक केमिकलने आंबा पिकवाल तर होणार थेट फौजदारी कारवाई; अन्न सुरक्षा आयुक्तांचे आदेश

English
हिंदी सारांश
Web Title : No More Afternoon Power Cuts: New Directives from Mahavitran

Web Summary : Mahavitran will now conduct maintenance work between 7 AM and 11 AM to avoid inconvenience during peak hours. Customers will receive SMS updates. Work includes tree trimming, replacing insulators, and transformer maintenance to ensure uninterrupted power supply during summer and monsoon.
टॅग्स :महावितरणएसएमएसमोबाइलवीजतापमानपाऊस