शेतजमिनींच्या डिजिटल सातबारा, आठ-अ तसेच फेरफार नोंदींना महसूल विभागाने अधिकृत कायदेशीर मान्यता दिली आहे. त्यामुळे आता तलाठ्याच्या सहीविनादेखील डिजिटल सातबारा उतारा पूर्णपणे अधिकृत मानला जाणार आहे.
कोणकोणत्या कामांसाठी वैध ठरणार?शासकीय व निमशासकीय कामकाज, बँक कर्जप्रक्रिया, पीककर्ज, जमीन खरेदी-विक्री, न्यायालयीन प्रकरणे तसेच विविध दाखल्यांसाठी वैध असतील.
सरकारकडून कायदेशीर मान्यतामहसूल विभागाने डिजिटल सातबारा, आठ-अ उतारा व फेरफार उताऱ्यांना पूर्ण कायदेशीर मान्यता दिली आहे. त्यामुळे हे उतारे अधिकृत शासकीय दस्तऐवज म्हणून वापरता येणार आहेत.
सही-शिक्क्यांची गरज नाहीडिजिटल उताऱ्यांना तलाठ्यांची सही किंवा शिक्का आवश्यक राहणार नाही. ऑनलाइन मिळणारा उतारा तसाच वैध मानला जाणार आहे.
१५ रुपयांत मिळणार डिजिटल सातबारा उतारामहाभूमी पोर्टलवरून केवळ १५ रुपयांत डिजिटल सातबारा उतारा मिळणार आहे.
व्यवस्थेत पारदर्शकताडिजिटल सातबारा (७/१२), आठ-अ (८- अ) तसेच फेरफार नोंदणी ऑनलाइन पद्धतीने करण्यास महसूल व्यवस्थेत पारदर्शकता वाढणार आहे. तसेच नागरिकांची डोकेदुखी कमी होईल
काय डिजिटल सातबारा, ८-अ, फेरफार उतारा?डिजिटल सातबारा (७/१२) हा शेतजमिनीच्या मालकी हक्क, क्षेत्रफळ, लागवड, पिकांची नोंद, आदी माहिती असलेला संगणकीकृत उतारा आहे.
कसा डाउनलोड करायचा?महाभूमी पोर्टलवर लॉगिन करून जिल्हा, तालुका, गाव व गट क्रमांक टाकल्यानंतर सातबारा उतारा मिळेल.
याही सुविधा डिजिटल मिळणार◼️ महसूल विभागाच्या विविध योजनांसाठी ऑनलाइन नोंदणी करता येईल.◼️ यात डिजिटल फेरफार नोंदी, मालमत्ता माहिती ऑनलाइन अर्ज व विविध महसूल सेवा टप्प्याटप्प्याने डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
अधिक वाचा: आता कॅफे किंवा एजंटची गरज नाही; तुमच्या मोबाईलवरूनच करा अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्जासाठी अर्ज
Web Summary : Maharashtra legalizes digital 'Satbara' extracts, eliminating the need for Talathi signatures. These extracts, costing ₹15 on the Mahabhumi portal, are valid for various purposes including loans and land transactions, increasing transparency.
Web Summary : महाराष्ट्र ने डिजिटल 'सातबारा' उद्धरणों को वैध किया, तलाठी के हस्ताक्षर की आवश्यकता समाप्त। महाभूमि पोर्टल पर ₹15 में उपलब्ध, ये उद्धरण ऋण और भूमि लेनदेन सहित विभिन्न उद्देश्यों के लिए मान्य हैं, पारदर्शिता बढ़ती है।