महावितरणकडून कृषिपंपांसाठी दिवसा वीजपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी सौरऊर्जेवर तातडीने कनेक्शन देण्याचा नवीन धोरण राबविला जात आहे.
सध्या पारंपरिक विद्युत खांबांवरून वीजपुरवठा थांबविला असून, त्याऐवजी स्वस्त पर्याय म्हणून सौरऊर्जेवर प्राधान्य देण्यात येत आहे. ही माहिती महावितरण कार्यालयातून देण्यात आली.
दोन हजार ७७३ मेगावॉट क्षमतेचे ५१२ सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित केले आहेत, असेही महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
महावितरणने त्याच्या दीर्घकालीन वीज खरेदी करारांमध्ये अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचे महत्त्व वाढवीत ६५ टक्के पर्यंत सौर आणि इतर नव्याने विकसित ऊर्जा स्रोतांचा समावेश केला आहे.
आतापर्यंत ७२ हजार ९१८ मेगावॉट क्षमतेच्या वीजखरेदी करारांमध्ये अपारंपरिक ऊर्जेला प्राधान्य दिले गेले आहे. अधीक्षक अभियंता अमित बोकिल म्हणाले, ऊर्जा परिवर्तनाच्या दिशेनं महावितरणने सौरऊर्जा क्षेत्रात महत्त्वपूर्ण कार्य केले आहे.
सध्या शेतकऱ्यांसाठी दोन हजार ७७३ मेगावॉट क्षमतेचे ५१२ सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित केले आहेत. महाराष्ट्र हे देशात सर्वाधिक ६० टक्के म्हणजे सहा लाख ४७ हजार सौर कृषिपंपांवर कार्यरत आहे.
महावितरणच्या सूक्ष्म नियोजनामुळे कोठेही भारनियमन न करता संपूर्ण राज्यात विक्रमात्मक २६ हजार ४९५ मेगावॉट विजेचा सुरळीत पुरवठा सुरू आहे.
महावितरणकडून एआय तंत्राचा वापर◼️ महावितरणने विद्युत मागणीचा अंदाज लावण्यासाठी आणि वीज खरेदीचे व्यवस्थापन अधिक कार्यक्षम करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित स्वतंत्र प्रणाली विकसित केली आहे.◼️ या आधुनिक प्रणालीच्या माध्यमातून मागणीचा अचूक अंदाज घेऊन सर्वांत कमी खर्चात वीज पुरवठा शक्य होत आहे, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
अधिक वाचा: ऊस तुटून गेल्यावर पाचट जाळण्यापेक्षा त्यावर 'ही' प्रक्रिया करून बघा; होतील असंख्य फायदे
Web Summary : MSEDCL introduces a solar-powered policy ensuring daytime electricity for farmers. Traditional power supply is replaced by affordable solar energy. 512 solar projects operational, promoting renewable energy sources. MSEDCL utilizes AI for efficient power management, ensuring uninterrupted supply across Maharashtra.
Web Summary : एमएसईडीसीएल ने किसानों के लिए दिन में बिजली सुनिश्चित करने हेतु सौर ऊर्जा नीति पेश की। पारंपरिक बिजली आपूर्ति को सस्ती सौर ऊर्जा से बदला गया। 512 सौर परियोजनाएं चालू, अक्षय ऊर्जा स्रोतों को बढ़ावा। एमएसईडीसीएल एआई का उपयोग कर कुशल बिजली प्रबंधन कर रहा है।